नवी दिल्ली : ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. सरन्यायाधीशांविरुद्ध खोटारडेपणा पसरवून जे कोणी न्यायसंस्था अस्थिर करून पाहत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ब्लॉगमध्ये व्यक्त केले आहे.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप केल्यानंतर जेटली यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. वैयक्तिक सभ्यपणा, मूल्य, नैतिकता आणि प्रामाणिकपणासंदर्भात भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यांच्या बाबतीत नितांत आदर आहे. त्यांच्या न्यायिक दृष्टिकोनाबाबत असहमती व्यक्त केली जाते; तेव्हा त्यांच्या नैतिकतेबाबत कधीही प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही. एका असंतुष्ट व्यक्तीच्या आरोपाचे समर्थन करणे सरन्यायाधीशांची संस्था अस्थिर करण्याच्या प्रक्रियेस मदत करण्यासारखे आहे. न्यायसंस्थेला नष्ट करण्यासाठी खोटारडेपणाची बाजू घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली गेली नाही, तर ही प्रवृत्ती वाढत जाईल.संस्था विस्कळीत करण्याचा अयशस्वी खटाटोप करू पाहणाºया चार डिजिटल मीडिया संस्था सरन्यायाधीशांच्या अशी प्रश्नावली पाठवितात तेव्हा प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. गेल्या काही वर्षांपासून संस्था विस्कळीत करणाºया संस्थांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत असल्याबद्दल जेटली यांनी खेद व्यक्त केला. संस्था विस्कळीत करणाºया अशा संस्थांना कोणतेही धरबंध नसतो. यापैकी अनेक डाव्या किंवा अतिडाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना कोणतेही लोकप्रिय समर्थन नसते, असे असताना मीडिया आणि शैक्षणिक संस्थात अशांचा मोठा भरणा आहे. मुख्य प्रवाहातील मीडियातून बाहेर गेलेल्यांनी डिजिटल आणि सोशल मीडियाचा आधार घेतला आहे, असे जेटली यांनी या ब्लॉगमध्ये म्हटले.
ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची - अरुण जेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 05:20 IST