शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

करुणानिधींच्या कुटुंबात भाऊबंदकी, मोठ्या भावाने स्टॅलिनविरोधात दंड थोपटल्याने द्रमुकमध्ये फूट अटळ

By बाळकृष्ण परब | Updated: January 4, 2021 17:23 IST

Tamilnadu Politics News : करुणानिधींच्या द्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले त्यांचे ज्येष्ठ पुत्र एम.के. अलागिरी यांनी बंधू आणि डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांच्याविरोधात रणशिंग पुकारले आहे.

ठळक मुद्देएम. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या अलागिरी यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सुरू केली मोर्चेबांधणी स्टॅलिन यांनी पक्षामध्ये पदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी माझा वापर करून घेतलामी सात वर्षे गप्प राहिलो. मात्र आता मी नव्या पक्षाची स्थापना करावी, अशी माझ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे

चेन्नई - तामिळानाडूमधील दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटंबामध्ये निर्माण झालेले मतभेद राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकच तीव्र होऊ लागले आहेत. करुणानिधींच्या द्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले त्यांचे ज्येष्ठ पुत्र एम.के. अलागिरी यांनी बंधू आणि डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांच्याविरोधात रणशिंग पुकारले आहे. रविवारी मदुराईमध्ये एक मोठ्या रोड शोच्या माध्यमातून अलागिरी यांनी राजकारणात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या रोड शो दरम्यान, अलागिरी यांनी बंधू स्टॅलिन यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच स्टॅलिन हे कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाही, आपले समर्थक असे होऊ देणार नाही, असा दावाही केला. यावेळी अलागिरी यांच्या समर्थकांनी अंजा नेंजम म्हणजे बहादूर हृदयाचा माणूस अशा घोषणा दिल्या.माजी केंद्रीय मंत्री आणि एम. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या अलागिरी यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपण लवकरच पुढील वाटचालीची घोषणा करणार असून, कार्यकर्त्यांनी त्यांचा निर्णय मान्य करावा असे आवाहन केले. मी असं काय वाईट केलं होतं ज्यामुळे माझी द्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच भाऊ स्टॅलिन यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप त्यांनी केला.

मला पदाची हाव कधीही नव्हती. मल पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहायचे होते. मी अनेक वेळा डीएमकेला वाचवलं आहे. मात्र स्टॅलिन यांनी पक्षामध्ये पदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी माझा वापर करून घेतला. मी सात वर्षे गप्प राहिलो. मात्र आता मी नव्या पक्षाची स्थापना करावी, अशी माझ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यावर मी लवकरच निर्णय घेणार आहे. मात्र मी जो काही निर्णय घेईन. तो तुम्ही स्वीकारावा, अशी माझी अपेक्षा आहे, असे अलागिरी यांनी सांगितले.

टॅग्स :Dravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमKarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारण