शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

स्टाफ सिलेक्शन परीक्षा आता मराठीतही, केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2023 07:23 IST

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मल्टि टास्किंग (नॉन टेक्निकल) पदांसाठी प्रथमच मराठीसह तेरा प्रादेशिक भाषांतून परीक्षा घेणार आहे.

नवी दिल्ली:

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मल्टि टास्किंग (नॉन टेक्निकल) पदांसाठी प्रथमच मराठीसह तेरा प्रादेशिक भाषांतून परीक्षा घेणार आहे. उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी या भाषांतूनही परीक्षार्थीना उत्तरपत्रिका लिहिता येतील.

केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केवळ एखादी भाषा येत नसल्याने कोणालाही नोकरी मिळण्यात अडथळे येऊ नयेत, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आहे. त्यामुळे इंग्रजी, हिंदी तसेच १३ प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.येत्या काळात परीक्षा २२ भाषांत घेणारकेंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, कनिष्ठ पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा हिंदी, इंग्रजी या भाषा व मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातील. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २२ भाषांमध्ये आगामी काळात ही परीक्षा घेण्यात यावी, अशी शिफारस या मुद्द्याच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीने केली होती. त्या शिफारसीचा केंद्र सरकारने स्वीकार केला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यत्वे दक्षिण भारतातून करण्यात येत होती. त्याचा विचार करून केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक भाषांतून या परीक्षा घेता येतील का, यावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समितीही नेमण्यात आली होती. तिने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला.- जितेंद्र सिंह, राज्यमंत्री,केंद्रीय कार्मिक खाते