शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी कपात सुरूच राहणार; पुन्हा हजाराेंच्या नाेकऱ्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 10:20 IST

पुन्हा हजाराेंच्या नाेकऱ्या जाणार, भरतीचाही वेग मंदावला

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आर्थिक वाढ मंदावल्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांत  कर्मचारी कपातीचे सत्र सुरूच असून, आता आणखी काही कंपन्यानी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. क्लाउड क्षेत्रातील वाढ मंदावल्यामुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोस्थित कंपनी ‘ड्रॉपबॉक्स’ने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनी १६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. २०२२च्या अखेरीस कंपनीत ३,११८ पूर्णवेळ कर्मचारी होते. त्यातील क्लाउड स्टोअरेज व्यवसायातील ५०० कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. 

क्लब हाउसमध्ये कपातऑडियो ॲप ‘क्लब हाउस’ने अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. कोविड-१९ साथीच्या काळात ग्राहकांच्या बदललेल्या सवयी आणि वर्क फ्रॉम होमच्या गुंतागुंतीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये कंपनीमध्ये सुमारे १०० कर्मचारी होते. ॲमेझॉनच्या उपकंपनीतही 

कर्मचाऱ्यांना बसविणार घरीॲमेझॉनची उपकंपनी ॲमेझॉन स्टुडिओ आणि प्राइम व्हिडीओ डिव्हिजनमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कर्मचारी अथवा डिव्हिजनच्या ७ हजार कर्मचाऱ्यांच्या सुमारे १ टक्का कर्मचारी काढले जाऊ शकतात. या क्षेत्रातील वॉल्ट डिझनी कंपनीने याआधीच ७ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

गेल्या तिमाहीत स्टार्टअप्सकडून ९,४०० जणांना मिळाले नारळn मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत स्टार्टअप्सने ९ हजार ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. निधी पुरवठा कमी झाल्यामुळे आणखी कपात हाेण्याची शक्यता आहे. n खर्च कमी करणे तसेच फंडिंग घटल्यामुळे स्टार्टअप्सनेही नाेकरभरती कमी केली आहे. पुढील सहा महिने अशीच स्थिती राहू शकते.

आयटी कंपन्यांचाही भरतीत हात आखडता    कंपनी    २०२१-२२    २०२२-२३    घट (%)     टीसीएस    १,०३,०००    २२,०००    -७८    इन्फाेसिस    ५४,३९६    २९,२१९    -४६    एचसीएल    ३९,९००    १७,०६७    -५७    विप्राे    ४५,४१६    १३,७९३    -७०    टेक महिंद्र    ३०,११९    १,२२७    -९६

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत