टंचाई निवारणार्थ दोन कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 00:39 IST
जळगाव- जिल्हा परिषद किंवा प्रशासनातर्फे जिल्हाभरातील टंचाईच्या निवारणासंबंधी विविध उपाययोजना, कार्यक्रमावर आतापर्यंत एक कोटी ९९ लाख ८५ हजार ६०३ रुपये खर्च झाल्याची माहिती जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली.
टंचाई निवारणार्थ दोन कोटी खर्च
जळगाव- जिल्हा परिषद किंवा प्रशासनातर्फे जिल्हाभरातील टंचाईच्या निवारणासंबंधी विविध उपाययोजना, कार्यक्रमावर आतापर्यंत एक कोटी ९९ लाख ८५ हजार ६०३ रुपये खर्च झाल्याची माहिती जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. त्यात १० गावांमध्ये १० विहीर खोलीकरण, १६५ गावांसाठी १५९ विहिरींचे अधिग्रहण, ११० गावांमध्ये २५८ नवीन विंधन विहिरी, कूपनलिका खोदल्या, २० गावांमध्ये २० तात्पुरत्या नळ योजना, ३१ गावांसाठी २३ टँकर सुरू आहेत. या कार्यक्रमावर आतापर्यंत एक कोटी ९९ लाख ८५ हजार ६०३ रुपये खर्च झाला आहे.