शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 05:34 IST

- त्रियुग नारायण तिवारी लोकमत न्यूज नेटवर्क अयोध्या : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा ...

- त्रियुग नारायण तिवारीलोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्यानगरी सुशोभित करण्याचे काम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने हाती घेतलेे आहे. 

अयोध्या नगरीच्या विकासाचे नोडल अधिकारी, तसेच अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की, रामजन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी चार कॉरिडॉर बनविण्यात येत असून, त्यांचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रामपथ, रामजन्मभूमी पथ, भक्ति पथ, धर्म पथ अशी त्यांची नावे आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ आता बांधून पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अयोध्येतील विमानतळ, अयोध्येतील रेल्वे स्थानकासहित ६ हजार कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण तसेच शिलान्यासही करतील. 

३७ मंदिरांमध्ये भाविकांसाठी उत्तम सुविधाnअयोध्येतील ३७ मंदिरांमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या मंदिरांच्या परिसरात भाविकांसाठी निवासाची सोय होईल. तसेच पाच टेन्ट सिटीची उभारणीही सुरू आहे. nया शहरातील सर्व धर्मशाळांची दुरुस्ती तसेच साफसफाई करून तिथेही भाविकांच्या राहाण्याची सोय करण्यात येईल. २२ जानेवारीला राममंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ही जय्यत तयारी सुरू आहे. 

धर्मपथावर असतील तीन भव्य राम स्तंभअयोध्येतील धर्म पथावर तीन राम स्तंभ उभारण्यात येतील. तिथून काही अंतरावर भव्य स्वरूपाची स्वागतकमान उभारण्यात येणार आहे. त्या कमानीवर भगवान सूर्याचे शिल्प तयार करण्यात येईल. धर्म पथावर दोन्ही बाजूला ४५-४५ वॉल म्युरल असणार आहेत. अयोध्येमध्ये भाविकांच्या निवासासाठी ५०० होम स्टेची सुविधा करण्यात आली आहे. अयोध्येतील हॉटेलांची निवासी क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उपाययोजना केल्या आहेत

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर