शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त टिप्पणी हार्दिक पांड्याला भोवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 08:56 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील एक वादग्रस्त विधान हार्दिक पांड्याला महागात पडणार आहे.

राजस्थान- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील एक वादग्रस्त विधान हार्दिक पांड्याला महागात पडणार आहे. जोधपूरच्या एका अनुसूचित जाती-जमातीच्या न्यायालयानं हार्दिक पांड्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पांड्याविरोधात न्यायालयात एकानं याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पांड्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

याचिकाकर्ते डी. आर. मेघवाल यांच्या मते, 26 डिसेंबर 2017ला हार्दिक पांड्यानं स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. ज्यात त्यानं डॉ. आंबेडकरांचा अपमान केला होता. त्याच्या या वादग्रस्त विधानामुळे अनेक दलित बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. हार्दिक पांड्यानं ट्विटमध्ये म्हटलं होतं की, कोण आंबेडकर ?, ज्यांनी देशाच्या संविधानाचा मसुदा तयार केला आणि देशाला आरक्षण नावाचा आजार दिला. पांड्याच्या याच विधानावर आक्षेप घेत मेघवाल यांनी याचिका दाखल केली आहे.राष्ट्रीय भीम सेनेचे सदस्य असलेल्या मेघवाल यांनी याचिकेत पांड्यानं बाबासाहेबांचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. एखाद्या क्रिकेटपटूनं अशा प्रकारची टिप्पणी करणे हा तर संविधानाचा अपमान आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी दलित बांधवांच्या भावनाही दुखावल्या आहेत, असंही मेघवाल यांनी याचिकेत नमूद केलं आहे. हार्दिक पांड्याच्या या ट्विटबाबत मला जानेवारीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली. हार्दिक पांड्याची ही टिप्पणी म्हणजे दलित बांधवांच्या भावना भडकावण्याचाच एक प्रकार असल्याचंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.  

टॅग्स :hardik pandyaहार्दिक पांड्या