शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर-ए-तय्यबाचा विशेष कसाब क्लास

By admin | Updated: July 7, 2014 04:25 IST

मुंबई हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने केलेल्या चुका टाळण्याचे प्रशिक्षण दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबा आपल्या नवीन दहशतवाद्यांना विशेष ‘कसाब क्लास’च्या माध्यमातून देत आहे.

श्रीनगर/ नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने केलेल्या चुका टाळण्याचे प्रशिक्षण दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबा आपल्या नवीन दहशतवाद्यांना विशेष ‘कसाब क्लास’च्या माध्यमातून देत आहे.लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मोहंमद जट ऊर्फ अबू हंझाला गेल्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दक्षिण काश्मीरमध्ये अटक करण्यात आली होती. तो मूळचा पाकिस्तानातील मुलतान येथील रहिवासी आहे. त्याच्या चौकशीतून ही बाब उघडकीस आली. जट याचे वडील पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त चालक आहे. लष्कर-ए-तय्यबाची एक संघटना जमात-ऊद-दावाकडून चालविल्या जाणाऱ्या मदरशामध्ये त्याचे आणि त्याच्या भावडांचे शिक्षण झाले आहे, अशी माहिती जट याने चौकशीदरम्यान दिली. २००८ च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी फासावर चढविण्यात आलेल्या कसाबला भेटल्याची कबुली देणारा जट हा पहिलाच दहशतवादी आहे. दक्षिण काश्मीरमध्ये अनेक पोलिसांना ठार करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. मुलतान जिल्ह्यात बोरवाला साहिवाला येथील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रामध्ये आपली कसाबशी ओळख झाली. या मदरशामध्ये कसाब याचे वडील खाटीक होते. या मदरशात जटने प्रशिक्षण घेतले होते. लष्कर-ए-तय्यबा नवीन प्रशिणार्थींना कसाबच्या चुकांसंदर्भात माहिती देत असल्याचे जट याने चौकशीदरम्यान सांगितले. अशा प्रकारची माहिती २००९ मध्ये मकसर अकसर शिबिरात ‘दौऊरा-ए-सुफा’ या प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली, असेही त्याने सांगितले.जट हा पाचवी नापास असून, उत्तर काश्मीरमधील केरान मार्गे आॅक्टोबर २०१२ मध्ये काश्मीरमध्ये दाखल झाला. त्याने २१ दहशतवाद्यांसह २०१३ च्या हिवाळा दाचीगाम जंगलात घालवला आणि त्यानंतर तो दक्षिण काश्मीरमध्ये आला. तो पोलीस आणि निमलष्कर दलाच्या जवानांना ठार करण्याच्या कामगिरीवर होता, असा दावाही जट याने केला. (वृत्तसंस्था)