प्लास्टीकमुक्त शहरासाठी विशेष मोहीम
By admin | Updated: August 26, 2015 00:19 IST
नागपूर : प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने प्रदूषण व घाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला आळा घालण्यासाठी झोन स्तरावर ५० मॉयक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या जप्त करा. प्लास्टीकमुक्त शहरासाठी विशेष मोहीम राबवा, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती देवेंद्र मेहर यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
प्लास्टीकमुक्त शहरासाठी विशेष मोहीम
नागपूर : प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने प्रदूषण व घाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला आळा घालण्यासाठी झोन स्तरावर ५० मॉयक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या जप्त करा. प्लास्टीकमुक्त शहरासाठी विशेष मोहीम राबवा, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती देवेंद्र मेहर यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिले.डेंग्यू आजारावर उपायोजना, हॉटेल, लॉन व मंगल कार्यालय इत्यादीवर आरोग्य विभागामार्फत करण्यात येणारी कारवाई, सेवाभावी संस्थांचे दवाखाने यांच्यावर देखरेख आदी विषयावर चर्चा करण्यात आली. परंतु झोन अधिकाऱ्यांकडे याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याने यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील बैठकीत माहिती सादर करण्याचे निर्देश मेहर यांनी दिले.उपसभापती मीना तिडके, सदस्य विषया खोब्रागडे, नीलिमा बावणे, योगेश तिवारी, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, जयश्री धोटे, डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. विजया जोशी यांच्यासह झोन अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)