शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

बोलाची कढी़

By admin | Updated: October 10, 2014 03:04 IST

पर्यायाने त्यांच्या कथित सर्वांगीण हातोटीचं नेमकं मूल्यमापन अशक्य. बरं त्यात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र राज्यही निर्णायक बहुमताने त्यांच्याच ताब्यात द्यावं

- राजेंद्र शिखरे

पाच बॅट्समन एक बॉलर

काँग्रेसला नामस्मरणविरहित चिंतनाची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताविरहित वकूब परीक्षणाची गरज आहे. रामदास आठवलेगटादी रिपब्लिकन पक्षांना किमान एखाद्या हक्काच्या गल्लीशोधाची निकड आहे. राजू शेट्टी, जानकर, मेटे यांना आपल्या स्वत:बाहेर आपला पक्ष सोडा, आपण स्वत:च कुठवर आहोत, हे कळवून घेणं अपरिहार्य आहे. अपक्ष म्हणून ज्यांनी आपलं विक्रीमूल्य वधारतं ठेवण्यातच आजवर धन्यता मानली, त्यांना आता, आपला कुंकू लावता म्हणून किमान बिज-तिजवर तरी आपल्या गळाला लागतोय का, यासाठी उंबरेघास अपरिहार्य आहे. सहीसलामत केंद्रातल्या सत्तेत जाण्याबरोबरच मोदी नावाच्या या वेळच्या निवडणूक आकर्षणानं बाकी काही नाही तरी हा इतका राजकीय परिणाम निश्चित साधला आहे. आणखी एक. आपल्याशिवाय महाराष्ट्रात बाकी हिंदुत्ववादी पक्षांना थारा मिळणं ही केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे, हा विद्यमान शिवसेनेचा अजेंडाही त्यांच्याकडून धाब्यावर बसवला गेला आहे. मनसेला अजून माणसाळण्याची तयारी निव्वळ दाखवण्यादाखलच नाही, तर त्यांनी माणसाळलं पाहिजे हेही त्यांनी लक्षात आणून दिलं आहे. मात्र दस्तुरखुद्द मोदींचा महाराष्ट्रातील भाजपा तरी फारच हवेत जातो आहे हीही बाब याच मोदी नावाच्या प्रलोभनाने मतदारांच्या ध्यानी आणून दिली आहे. अर्थात यातून महाराष्ट्राचं झालंच तर भलं होईल अन्यथा हे शिवराज्य कित्येक वर्षं मागं जाईल. सगळ्याच अर्थाने! मोदींनी चेंडू मतदारांहाती दिला आहे. ढोबळ सरासरीने एकाच वेळी खेळू पाहते पाच बॅट्समन विरु द्ध कोटी हातांचा एकच बॉलर. म्हटलं तर गेम चेंजर. म्हटलं तर गेम लूजर... दोघंही. मोदी आणि मतदार. क्रिटिकल पोझिशन. क्रिटिकल कंडिशन. दोघांचीही. मोदींची आणि मतदारांची. कारण प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत वय वाढवूनही मोदींचा कार्यकाळ शंभर वर्षांवर जात नाही. पर्यायाने त्यांच्या कथित सर्वांगीण हातोटीचं नेमकं मूल्यमापन अशक्य. बरं त्यात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र राज्यही निर्णायक बहुमताने त्यांच्याच ताब्यात द्यावं, मंडळी उतण्या-मातण्याची दाट भीती. सध्याच पी हळद आणि हो गोरी अशी अवस्था आहे. बरं बाळासाहेबांपश्चातच्या शिवसेनेची महाराष्ट्राला अजून गरज आहे. पण राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासानुसार, सध्या ती निकडही फक्त निडर मराठी सैनिक म्हणून. ना राजा ना सेनापती म्हणून. इंजीन तर कुठं कुठं धावण्या, थांबण्याच्या सरावातच गोंधळतंय. पवार साहेब हुशार. अर्थातच मोठे पवार साहेब. त्यांनी हुशारीनं आपली राज्यसभा पटकावली. हो! पार्लमेंटमध्ये पास काढून जायला नको. प्रेक्षक गॅलरी टळली की आपसूक पीचफंड्यात राहता येतं. आणि त्यात पवारांच्या हातावरच्या घड्याळाची, न जाणो मोदींनाही गरज भासू शकते. युती तोडून भाजपाने आणि आघाडी टाळून शरद पवार यांनी, बघायला गेलं तर परस्परांना विश्वास आणि एकदुसऱ्यांना ठाम शाश्वती तर देऊ केली आहे; अशी अशाच उच्च विचारसरणीच्या मोठ्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज आणि उद्धव ठाकरे बंधूंनीही या संशयाची पुष्टी केली आहे. पुढं जाऊन मोदींच्या मंत्रिमंडळात पवारांना मंत्री म्हणून पाहायला लागलं तर आश्चर्य वाटू देऊ नका; असंही त्यांनी त्यांच्या मतदारांना आगाऊच सांगून ठेवलं आहे. आता सांगा. मतदार गोंधळेल नाहीतर काय होईल? मग भले तो कधीकाळी राजा शिवछत्रपतींचा, शाहू-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र होता म्हणून काय झालं? ...महात्मे बदले तशी परिस्थिती आणि परिस्थितीबरहुकूम गरजा आणि गरजेप्रमाणे जनता बदलती राहिली, तर तीही स्वाभाविक परिक्र माच! थोडक्यात, विद्यमान नेत्यांच्या नाठाळ बोलकढीला आताशा मतदार भीक घालेल असं संभवत नाही. नेमकं मतदान होणार आहे. हा अखंड महाराष्ट्र इथल्या जनतेचाच राहणार आहे.