शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या दीप प्रज्वलनाला दक्षिणेत सर्वात कमी प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 05:04 IST

पूर्व आणि ईशान्येतील राज्यांचा सर्वाधिक प्रतिसाद

संदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी लोकांमध्ये भावनीक बळ निर्माण व्हावे या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनाचे जेवढे कौतुक झाल तेवढी टीकाही झाली. मात्र, या आवाहनाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिल्याचे रविवारी स्पष्ट झाले. विशेष बाब म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात कमी असलेल्या ईशान्य आणि पुर्वेतील राज्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाल आहे. तर, सर्वात कमी प्रतिसाद दक्षिणेच्या राज्यांतील जनतेने दिल्याची महिती हाती आली आहे.केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पावर सिस्टीम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीओएसओसीओ) रविवारी देशभरात झालेल्या या मोहिमेची सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला आहे. त्यात दिलेल्या आकडेवारीची मांडणी केल्यानंतर हा निष्कर्ष हाती आला आहे. देशात वीज पुरवठा हा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि इशान्य असा पाच विभागांनुसार केला जातो. अहवालातील आकडेवारीनुसार रविवारी रात्री ९ ते ९.१० या काळात दक्षिणेतील राज्यांतली विजेची मागणी १७ टक्क्यांनी कमी झाली होती. ईशान्येत हे प्रमाण ४० टक्के तर पुर्वेतील राज्यांमध्ये ३५ टक्के होते. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तरेत २६ टक्के तर पश्चिमेतील राज्यांमध्ये विजेची मागणी २४ टक्क्यांनी कमी झाली होती.रविवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी देशातील विजेची मागणी १ लाख १६ हजार ८८७ मेगावॅट होती. लोकांनी दिवे बंद करायला सुरूवात केल्यानंतर ती मागणी ८५ हजार ७९९ मेगावॅटपर्यंत कमी झाली होती. ही घट ३१ हजार ८९ मेगावॅटची होती.पीओएसओसीकडून इव्हेंट असा उल्लेखदेशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पंतप्रधानांची इव्हेंट करण्याची हौस भागत नाही अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे पीओएसओसीकडून प्रसिध्द केलेल्या अहवालातही या आवाहनाचा उल्लेख इव्हेंट असा करण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या