शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या निषेधाने संमेलनाचे सूप, धर्मा पाटील आत्महत्येची साहित्यिकांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:04 IST

महाराज सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला.

प्रज्ञा केळकर-सिंग/स्नेहा मोरेमहाराज सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला. सरकारच्या असंवेदनशीलतेबद्दल नाराजी व्यक्त करत, शासनाने सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजून घेत प्रामाणिकपणे सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.आगामी संमेलनासाठी ७ निमंत्रणेआगामी ९२व्या संमेलनासाठी ७ निमंत्रणे आली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहुपुरी शाखा (जि. सातारा), विदर्भ साहित्य संघाची अमरावती आणि वाशीम शाखा, साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठान (अंमळनेर), एज्युकेशन ट्रस्ट-नायगाव बाजार (जि. नांदेड) आणि बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय, तसेच ‘भिलार’ या पुस्तकांच्या गावाच्या निमंत्रणाचा त्यात समावेश असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी सांगितले.१६ ठराव संमत करून९१व्या संमेलनाची सांगताअध्यक्षीय ४ ठरावांसह १६ ठराव टाळ््यांच्या गजरात संमत करून, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ९१व्या संमेलनाची सांगता झाली.राज्य शासनाने ‘मराठी लर्निंग अ‍ॅक्ट’ हा कायदा तातडीने संमत करावा, बडोदे विमानतळास महाराज सयाजीराव गायकवाड यांचे नाव द्यावे. महाराजांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान बहाल करावा आणि गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, छत्तीसगड या सीमावर्ती राज्यांनी राज्य मराठी अकादमी स्थापन करावी आदी ठराव अध्यक्षीय अधिकारात करण्यात आले. विविध क्षेत्रांत मराठीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, बडोदा येथे गुजरात मराठी अकादमी आणि स्वतंत्र अनुवाद अकादमीची स्थापना आदी मागण्यांचे साकडे घालण्यात आले.

टॅग्स :marathiमराठीBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन