भारत - पाकिस्तानचा सन्मान : सत्यार्थी व मलाला यांना शांततेचे नोबेल प्रदान
ओस्लो : अडचणीत असलेला प्रत्येक चिमुकला आपल्या मदतीची प्रतीक्षा करतोय. तो विचारतोय, तुम्हाला माङयार्पयत येण्यास एवढा का वेळ लागला. चिमुकल्यांची स्वप्नं मारणो हा जगातील सर्वात मोठा गुन्हा आहे.
जगात शांतता प्रस्थापित करायची
असेल तर कोटय़वधी बालकांना
स्वप्नं पाहण्याची आणि ती साकार करण्याची शक्ती द्यावी लागेल. आपण प्रत्येक जण हे काम नक्की करू शकतो. अशी हाक देत कैलास सत्यार्थी यांच्या रूपाने आज सा:या विश्वात शांततेचा आवाज घुमला. दक्षिण अशियातील प्रमुख देश असणा:या भारत व पाकिस्तानमध्ये बालहक्कासाठी लढणा:या कैलाश सत्यार्थी व मलाला युसूफझाई या भारत व पाकिस्तानच्या शांतता दूतांना आज 2क्14 चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आईने नेहमी खरं बोलण्याची शिकवण दिल्यामुळे इथर्पयत पोहोचू शकले. आपल्याला कमी वयात सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने भरभरून आनंद झाला आहे.
- मलाला युसूफझई
जागतिक पातळीवर मुलांना त्यांचे हक्क द्या़ त्यांना शिक्षण द्या, त्यांचे बालपण परत द्या. जगाला शांततेचा संदेश यायचा असेल तर सुरु वात मुलांपासून करा, असे महात्मा गांधी नेहमी सांगत असत. मुलांची स्वप्नं मोडणो ही एक प्रकारची हिंसाच आहे. त्यांना शिक्षण दिले नाही तर मानवतेचे सर्वात मोठे नुकसान होईल. - कैलाश सत्यार्थी
नोबेल पुरस्काराचे संस्थापक आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रत ‘चँम्पियन्स ऑफ पीस’ म्हणून ज्यांचे वर्णन केले आहे, त्यात सत्यार्थी व मलाला अगदी अचूक बसतात. एक प्रौढ माणूस आणि एक युवा मुलगी, एक भारताचा आणि दुसरी पाकिस्तानची एक हिंदू एक मुस्लीम; दोघेही जगाला आज ज्याची गरज आहे त्याचे प्रतीक आहेत. - थोर्बजॉन जगलँड, अध्यक्ष, नोबेल समिती
8क् हजार मुले अजूनही वंचित आहेत़ त्यांची मुक्तता करणो हेच माङो ध्येय आहे, असे याप्रसंगी बोलताना सत्यार्थी म्हणाले. आपल्या सर्व मुलांना शिक्षणही देऊ शकत नाही, इतके जग गरीब आहे, हे मला मान्य नाही.
जगात लष्करावरील एका आठवडय़ाच्या खर्चात आपल्या सर्व मुलांचे शिक्षण होऊ शकते. आता जागतिक पातळीवर मुलांचा विचार सहृदयतेने होण्याची गरज आहे, असे त्यानी सांगितले.
बचपन बचाव आंदोलन या संस्थेची स्थापना एका दिवसात झालेली नाही. वयाच्या 11 व्या वर्षापासून सजगतेने परिस्थिती पाहणा:या माङया मनाने उचललेले हे पाऊल आहे. बालमजुरांची संख्या निश्चितपणो घटते आह़े हे सांगताना सत्यार्थी म्हणाले, की 2क्क्क् साली 78 कोटी बालमजूर होत़े आज त्यांची संख्या 17 कोटी झालेली आहे.
दहशतवाद्यांच्या बंदुका नाही, तर शिक्षणामुळेच जगाचा विकास
यापुढे भारत आणि पाकिस्तान शांततेसाठी एकत्न काम करेल. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी नेहमीच झगडत राहील. दहशतीमुळे घाबरलेल्या मुलांना विकासाचे मोठे आव्हान असल्याचे मलाला म्हणाली.
एका माणसाची हत्या म्हणजे संपूर्ण मानव जातीची हत्या असल्याचे पवित्न कुराणमध्ये सांगितले आहे. दहशतवाद्यांच्या बंदुका नाही, तर शिक्षणामुळेच संपूर्ण जगाचा विकास होणार आहे, असे सांगत मलालाने इस्लामच्या नावाखाली दहशतवाद पसरवणा:यांचा निषेध केला.