Post Covid Symptoms: कोरोना व्हायरस संदर्भात संशोधकांसमोर दिवसेंदिवस नवं आव्हान उभं राहत आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या पित्ताशयाला सूज येण्याची नवी समस्या समोर येत असल्याचा अहवाल उघडकीस आला आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचं एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. यात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या पित्ताशलाला सूज आणि ब्लड शुगरमध्ये वेगानं वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार ४८ वर्षीय महिलेला कोरोनावर मात केल्यानंतर पित्ताशयाला सूज आल्याचं दिसून आलं आहे. डॉक्टर देखील हैराण झाले आहे. सामान्यत: पित्ताशयात खडा झाल्यास पित्ताशयाला सूज येते. पित्ताशयातून छोट्या आतड्यांमध्ये जाणारी नलिका खड्यामुळे बंद होते. त्यामुळे पित्ताशयाला सूज येते. पण संबंधित महिलेला पित्ताशलायीतल खड्याचा कोणताही त्रास नव्हता. याशिवाय या महिलेला याआधी देखील पित्ताशयाशी निगडीत कोणताही त्रास नव्हता. दरम्यान, महिलेला कोरोनावर मात केल्यानंतरच पित्ताशयाचा त्रास सुरू झाल्याचं समोर आल्याचं दिल्लीतील मूलचंज मेडसिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आहे. कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांमध्ये दिसून येणाऱ्या परिणामांमध्ये पित्ताशयाचा त्रास हे प्रकरण नवं असलं तरी याआधी काही जणांमध्ये गँग्रीनसारख्या समस्या निर्माण झाल्याचंही समोर आलं आहे.
AIIMS च्या सर्व्हेक्षणात थक्क करणारा खुलासापाटणा येथील एम्स रुग्णालयानं कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचं सर्व्हेक्षण केलं होतं. या सर्व्हेक्षणात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये शुगर लेव्हल, थकवा, डोकेदुखीसह काही समस्या उद्धभवल्याचं समोर आलं होतं. यात डॉक्टरांनी जवळपास ३ हजार लोकांचं सर्व्हेक्षण केलं होतं. यातील ४८० जणांनी म्हणजेच जवळपास १६ टक्के लोकांमध्ये कोविडवर मात केल्यानंतर ब्लड शुगरचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे. तर २८ टक्के लोकांनी कोरोनावर मात केल्यानंतर अशक्तपणात वाढ झाल्याचं सांगितलं. २१.२ टक्के लोकांना थकवा जाणवला. याशिवाय १५.८ टक्के लोकांना खोकला, ५ टक्के लोकांना श्वास घेण्यात त्रास, ०.३३ टक्के लोकांना गँग्रीन, ७ टक्के लोकांना हायपरटेन्शन, ०.१६ टक्के लोकांमध्ये ब्लॅक फंगस आणि जवळपास ४ टक्के रुग्णांना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे.