नवी दिल्ली : रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात भरभक्कम पाऊल टाकून भले मोठे आव्हान उभे केले असताना देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने तूर्त दरकपात न करण्याचा निर्णय घेतला. एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी म्हणाले की, एअरटेलचा महसूल वाढतच आहे. येणाऱ्या तिमाहीत तो आणखी वाढेल. रिलायन्स सध्या पूर्णत: मोफत सेवा देत आहे. पण कोणीही सर्व काळ मोफत सेवा देऊ शकत नाही. जिओ दर आकारील, तेव्हा आम्ही आमचे दर काय असावे, हे ठरवू. गरज भासल्यास आम्ही दर कमी करू.आम्ही काही प्लॅनमध्ये आताच मोफत कॉलिंग सेवा देऊ केली आहे. काही प्लॅनमध्ये मात्र आम्ही कॉलिंग आणि डाटा या सेवांना स्वतंत्रपणे दर आकारणार आहोत. ग्रामीण भागात विस्तार करण्यावर कंपनी आता भर देईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तूर्तास दरकपात नाही
By admin | Updated: November 4, 2016 04:29 IST