शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

आजवर ३१९ आमदार झाले निलंबित

By admin | Updated: March 23, 2017 17:15 IST

आजवर ३१९ आमदार झाले निलंबित

आजवर ३१९ आमदार झाले निलंबित
निलंबनाचा मागोवा : जांबुवंतराव धोटे पहिले निलंबित सदस्य
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील ३१९ सदस्य ४४ प्रकरणांमध्ये आतापर्यंत निलंबित झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४३ सदस्य हे ७ नोव्हेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून निलंबित झाले होते.
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे संयुक्त महाराष्ट्रानंतर निलंबित झालेले पहिले आमदार होते. अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट फेकल्याने त्यांच्यावर १३ ऑगस्ट १९६४ रोजी ही कारवाई करण्यात आली. नंतर त्यांचे सदस्यत्वच रद्द करण्यात आले. त्या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले होते.
दुष्काळ निवारणासंबंधीच्या मागण्यांवरून गोंधळ घातल्याबद्दल २७ आमदारांना निलंबित केल्याची घटना २३ मार्च १९७३ रोजी घडली होती. आज सभागृहात कापडी फलक फडकविणे ही आम बाब बनली आहे. मात्र, याच कृतीवरून शिवसेनेचे तत्कालिन सदस्य छगन भुजबळ यांच्यावर निलंबनाची कारवाई २६ नोव्हेंबर १९८७ रोजी नागपूर अधिवेशनात करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न करणे असा आरोप करीत शिवसेनेच्या तीन आमदारांना २४ जुलै १९९१ रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यातील कालिदास कोळंबकर हे आज काँग्रेसचे आमदार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याच्या शासनाच्या निर्णयावरून संतप्त झालेल्या शिवसेनेच्या १२ सदस्यांनी विधानसभेत साहित्याची नासधूस, मोडतोड केली म्हणून २५ जुलै २००० रोजी निलंबित करण्यात आले आणि याच मुद्यावर आणखी दोन आमदारांवर हीच कारवाई दुसर्‍या दिवशी करण्यात आली होती.
आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात आधी निलंबित झाले ते २७ मार्च २००१ रोजी. तत्कालिन राज्यमंत्री एकनाथ गायकवाड यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सभागृहात गोंधळ व गैरवर्तन केल्यामुळे फडणवीस यांच्यासह नऊ आमदारांवर ही कारवाई करण्यात आली होती. शेतकरी आत्महत्या प्रकरणी सभागृहात आक्षेपार्ह फलक फडकविले व प्रेतयात्रा काढल्याबद्दल फडणवीस आणि अन्य नऊ सदस्यांवर ५ डिसेंबर २००६ रोजीदेखील निलंबनाची कारवाई झाली होती.
आजचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात असताना अध्यक्षांच्या दालनात येऊन उपाध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना १३ डिसेंबर २००५ रोजी नागपूर अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. (विशेष प्रतिनिधी)
----------------------------------
पुरस्कार देणे झाले बंद
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील आमदारांना उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार ८ वर्षांपासून देण्यातच आलेले नाहीत. शेवटचा पुरस्कार वितरण सोहळा २००९ मध्ये झाला होता. त्यावेळी विधान परिषदेच्या १७ आणि विधानसभेच्या १४ सदस्यांना गौरविण्यात आले होते. २००३ पासूनचे ते पुरस्कार होते. गोंधळाबद्दल निलंबनाची शिक्षा दिली जाते पण चांगल्या कामगिरीबद्दल पुरस्काराची शाबासकी विधानमंडळाकडून मिळत नसल्याची आमदारांची खंत आहे.
-----------------------------------