गुवाहाटी : आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सर्वानंद सोनोवाल यांची रविवारी एकमताने निवड झाली. त्यामुळे त्यांचा या राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपा आमदारांच्या पहिल्या बैठकीत आमदार हेमंत विश्वशर्मा यांनी सोनोवाल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. आमदार पी. फुकन, अतुल बोरा, अंगुरलता डेला, भाबेश कलिटा आणिए.सी. जैन यांनी सोनोवाल यांच्या नावाला समर्थन दिले. केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत हे भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनीच सोनोवाल यांच्या निवडीची घोषणा केली. (वृत्तसंस्था)
सोनोवाल यांची नेतेपदी निवड
By admin | Updated: May 23, 2016 04:03 IST