शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

सोनियांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृतीत सुधारणा

By admin | Published: August 05, 2016 5:42 AM

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना अतीव दक्षता कक्षातून सामान्य कक्षात हलविले आहे. सर गंगाराम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी.एस. राणा यांनी गुरुवारी मेडिकल बुलेटिनद्वारे ही माहिती दिली. सोनियांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखऱ्या खांद्यावरील उपचारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डॉक्टरांचे एक पथक गंगाराम हॉस्पिटलमध्ये बोलविण्यात आले होते. मुंबईचे डॉक्टर संजय देसाई आणि गंगाराम हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतीक गुप्ता यांचा या पथकात समावेश होता. या पथकाने सोनिया यांच्या खांद्यावर बुधवारी रात्री यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया दोन तास चालल्याचे सूत्रांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर सोनिया यांना फिजियोथेरेपीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच थांबावे लागेल, असे राणा यांनी सांगितले.