शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

"सोनियांनी २००४ मध्ये पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं; काँग्रेसची दुर्दशा झाली नसती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 23:06 IST

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष होतात, तर सोनियाही भारताच्या पीएम होऊ शकत होत्या; आठवलेचं विधान

इंदूर: भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष होऊ शकतात, मग इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधीदेखील १७ वर्षांपूर्वी देशाच्या पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, असं विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) बहुमत मिळालं होतं. तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं, असं आठवले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा असताना आठवलेंनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. '२००४ च्या निवडणुकीत यूपीएला बहुमत मिळालं. सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं असा प्रस्ताव त्यावेळी मीच पुढे ठेवला होता. त्यांच्या परदेशी वंशाचा त्यावेळी कोणताही विषय नव्हता, असं माझं मत होतं. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षा होऊ शकतात. तर भारताच्या नागरिक, राजीव गांधींच्या पत्नी आणि लोकसभेवर निवडून आलेल्या सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?', असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला.नरेंद्र मोदी कोवॅक्सिन घेऊन अमेरिकेला जाऊ शकतात तर मी रोमला का नाही? ममतांचा सवाल

'पवार पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसची दुर्देशा झाली नसती''सोनिया गांधींनी २००४ मध्ये पंतप्रधान व्हायला हवं होतं. त्यांना पंतप्रधान व्हायचं नव्हतं, तर त्यांनी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे पंतप्रधानपदाची सूत्रं द्यायला हवी होती. पवार लोकनेते असल्यानं ते पंतप्रधानपदासाठी अधिक योग्य होते. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या जागी पवारांना संधी द्यायला हवी होती. पवार २००४ मध्ये पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसची अशी दुर्दशा झाली नसती,' असं आठवले म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीRamdas Athawaleरामदास आठवलेNCPराष्ट्रवादी काँग्रेस