शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

सोनिया गांधी सुखरूप घरी परतल्या

By admin | Updated: August 15, 2016 05:58 IST

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ११ दिवसांच्या उपचारानंतर १0 जनपथ या आपल्या निवासस्थानी सुखरूप परतल्या.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ११ दिवसांच्या उपचारानंतर १0 जनपथ या आपल्या निवासस्थानी सुखरूप परतल्या. भारताच्या ७0 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना उद्देशून त्यांनी लगेच एक संदेशही जारी केला आहे. पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघात रोड शो करीत असतांना प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे एका चार्टर्ड विमानाने ६९ वर्षे वयाच्या सोनिया गांधींना तातडीने दिल्लीला सैन्यदलाच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर ३ आॅगस्ट रोजी सर गंगाराम रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला व तापही आला. उपचारानंतर रुग्णालयातून डिसार्ज देतांना सर गंगाराम हॉस्पिटलच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी.एस.राणा म्हणाले, ‘३ आॅगस्ट रोजी श्रीमती गांधींवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेची जखम बऱ्यापैकी बरी झाली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. नियमित औषधोपचार चालू ठेवण्यासह त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पुढल्या सप्ताहात चेक अप साठी त्या पुन्हा रुग्णालयात येतील.’>स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील तरुणांना दिला संदेशस्वातंत्र्यदिन केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादीत नसून देशासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान केले त्या हुतात्म्यांची व स्वातंत्र्य दिनामागची मूल्ये व सिध्दांतांचे स्मरण करणेही आवश्यक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशातल्या महान क्रांतीकारकांनी अनेक वर्षे निर्धाराने संघर्ष केला. अनेक सुपुत्रांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. सत्य व अहिंसेच्या मार्गाने आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केवळ ब्रिटिश साम्राज्याचा पायाच हलवून सोडला नाही, तर जगातल्या अनेक स्वातंत्र्य आंदोलनांनाही प्रेरणाही दिली.स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्मितीच्या उभारणीत देशातले शेतकरी, कामगार, वैज्ञानिक, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक व विचारवंतांनीही अमूल्य योगदान दिले आहे. मातृभूमीच्या सेवेत, देशाची अखंडता व एकता कायम ठेवण्यासाठी सैन्यदलाच्या तिन्ही विभागांनी निस्वार्थ सेवा केली आहे. देशवासियांनी या सर्वांपुढे आदराने नतमस्तक व्हावे, असा हा स्वातंत्र्यदिन आहे.