शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

संसदीय पक्षनेतेपदी पुन्हा सोनिया गांधी

By admin | Updated: May 25, 2014 05:22 IST

काँग्रेसच्या खासदारांनी शनिवारी संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने फेरनिवड केली.

शीलेश शर्मा, नवी दिल्ली - काँग्रेसच्या खासदारांनी शनिवारी संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने फेरनिवड केली. त्याचवेळी लोकसभा आणि राज्यसभेच्या नेत्यांच्या निवडीचे अधिकार त्यांना बहाल केले. लोकसभेत पक्षनेतेपदी कमलनाथ किंवा अमरेंद्रसिंग यांच्यापैकी एकाची निवड होण्याचे संकेत मिळाले आहेत. ए.के. अ‍ॅन्टनी किंवा गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेत पक्षनेतेपद दिले जाईल. दोन्ही सभागृहांतील नेत्यांच्या नावांची घोषणा ४ जुलै आधी होण्याची शक्यता आहे. १६व्या लोकसभेचे सत्र सुरू होण्यापूर्वी डावपेच आखले जातील. ‘जशास तसे’ धोरण संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच कॅगच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजपा सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक रणनीती आखण्याचे काम सुरू केले आहे. गुजरात सरकारवर ताशेरे ओढणारा कॅगचा अहवाल विधानसभेत सादर होणार असून हाच मुद्दा गुजरात विधानसभेत आणि लोकसभेत काँग्रेसच्या आक्रमणाची धार वाढवणार आहे. भाजपाने संपुआ सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत रान उठविले होते त्याचे कारण कॅगचा अहवालच होता. आता जशास तसे उत्तर देण्याची पाळी आली आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला अनौपचारिक संवाद साधताना म्हटले. ‘दिल्ली मे गुजरात का चोर, चारो ओर सीएजी का शोर’ हा काँग्रेसचा नवा नारा संसदेचे दोन्ही सभागृह दणाणून सोडणार आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीत मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याची प्रशंसा करणारा प्रस्ताव पारित करण्यात आला. प्रगतीशील आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी सामूहिक डावपेच आखत मजबूत विरोधी पक्षाचे दर्शन घडवावे, असे आवाहनही या प्रस्तावात केले आहे.