शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध राजशी लग्न केले राजाशी; सोनम रघुवंशीने हनिमूनवर असतानाच केली पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:33 IST

सोनम रघुवंशीने पती राजाच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Sonam Raghuvanshi: मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदौरच्या राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. मेघालय पोलिसांनी राजाची पत्नी सोनम हिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक केली आहे. सोनम व्यतिरिक्त इतर तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमचा तिच्या पतीच्या हत्येत सहभाग होता आणि तिने यासाठी मध्य प्रदेशातील हल्लेखोरांना सुपारी दिली होती. सोनमचे राजाशी लग्न झाले असताना राज कुशवाहा नावाच्या व्यक्तीशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे म्हटलं जात आहे.

इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आज पत्नी सोनमला अटक करण्यात आली. गेल्या १७ दिवसांपासून सोनम बेपत्ता होता.सोनम रघुवंशी हिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला आणि गुन्हा केल्यानंतर ती गायब झाली होती. गाझीपूर येथील एका ढाब्यावरुन सोनमने तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतले. सोनमने हे सर्व तिचा प्रियकर राज कुशवाहासाठी केल्याचे म्हटलं जात आहे. सोनम आणि राज कुशवाहा बऱ्याच काळापासून प्रेमात होते. जेव्हा सोनमचे राजा रघुवंशीशी लग्न झाले तेव्हा सोनमने प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीची हत्या केली. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोनमचे राज नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते आणि दोघांनीही राजाला मारण्याचा कट रचला होता. मेघालयात गेल्यानंतर सोनम सतत काही लोकांशी फोनवर संपर्कात होती आणि तिचे लोकेशन शेअर करत होती. सोनमने ११ मे रोजी राजाशी लग्न केले आणि २१ मे रोजी दोघेही हनिमूनसाठी निघून गेले होते. २ जून रोजी राजाचा मृतदेह मेघालयातील एका खड्ड्यात आढळला होता. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मध्य प्रदेशातील आहेत, ज्यांना सोनमने सुपारी दिली होती. राजाची हत्या झाली तेव्हा सोनम तिथेच उपस्थित असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण गुन्ह्याच्या ठिकाणी सोनमचे एक जॅकेट सापडले होते. सीसीटीव्हीमध्ये राज आणि सोनम स्कूटीवर फिरताना दिसत होते. याशिवाय सोनमभोवती तीन पुरुष देखील दिसले होते.

राज कुशवाहा हा सोनम रघुवंशीपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. सोनम रघुवंशीच्या कुटुंबाचे प्लायवूडचे दुकान होते. राज कुशवाहा या दुकानात काम करायचा. दुकानात जाताना आणि येताना सोनमची राजशी भेट झाली. काही काळानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली. सोनमच्या कुटुंबाने तिचे लग्न इंदौरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीसोबत ठरवले. सोनम आणि राजाचे लग्न ११ मे २०२५ रोजी झाले. मात्र सोनमने लग्नानंतर अवघ्या ६ दिवसांनी राज कुशवाहासह राजाला संपवण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी