शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:05 IST

Raja Raghuvanshi Murder Case: राजा यांचे पिता अशोक रघुवंशी यांनी असा दावा केला की, सोनमने आपल्या कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी आणि प्रियकर राज कुशवाह याच्याशी विवाह करता यावा म्हणून पतीची हत्या केली.

पाटणा/इंदूर - इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडात प्रमुख आरोपी असलेली त्यांची पत्नी सोनमला घटनास्थळी शिलाँगला नेले जात आहे. दरम्यान, राजा यांचे पिता अशोक रघुवंशी यांनी असा दावा केला की, सोनमने आपल्या कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी आणि प्रियकर राज कुशवाह याच्याशी विवाह करता यावा म्हणून पतीची हत्या केली.

हनीमूनसाठी मेघालयात गेल्यानंतर राजा रघुवंशी याची हत्या झाली होती. भाडोत्री मारेकऱ्यांकरवी पत्नी सोनमनेच (२५) पतीचा काटा काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या दिवशी सोनमने व्रत ठेवले होते, त्याच दिवशी तिने डोळ्यासमोर पतीला संपविले. योजनेनुसार, राजाला धबधब्याच्या जवळ मारायचे होते. या दरम्यान, सुपारी किलर पायऱ्या चढून थकला होता, म्हणून तो मारण्यास नकार देत होता. तेव्हा सोनम त्याला ओरडून म्हणाली की, त्याला मारावे लागेल. मी तुला २० लाख रुपये देईन.

सोनमने इशारा केला आणि तिच्या डोळ्यादेखत...पोलिसांनुसार, सोनम व राजा रघुवंशी शिलाँगला पोहोचल्यानंतर मारेकऱ्यांनी सोनमच्या समोरच राजाची हत्या केली. मारेकऱ्यांना गुवाहाटीत बोलावून एक धारदार शस्त्र खरेदी करण्यात आले.  

मंगळ दोष असा जात नाहीदरम्यान, मृत राजाच्या वडिलांनी मंगळ दोषाबाबत केलेल्या आरोपाबाबत स्थानिक ज्योतिषी धीरज दीक्षित यांनी सांगितले, की कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष असेल तर तो त्याचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूमुळे कमी होत नाही. सोनमने आरोपींसाठी तिकिटे बुक केली होती. काम झाले पाहिजे असे तिने ३ आरोपींना सांगितले होते.

तडफडून मुलगा गेला, मारेकऱ्यांना फाशी द्यामृत राजा यांचे पिता अशोक रघुवंशी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की ‘माझा मुलगा तडफडून गेला आहे.त्याच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे. जेणेकरून यातून एक संदेश गेला पाहिजे आणि यानंतर अशा प्रकरणांत कोणत्याही माता-पित्याला आपला मुलगा गमवावा लागू नये.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश