शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला हौतात्म, सून सारं काही घेऊन गेली, कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी मांडली व्यथा, केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:19 IST

Captain Anshuman Singh Family: गतवर्षी सियाचिनमध्ये लष्कराच्या एका तळावर लागलेल्या आगीत सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म आलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून नुकतंच कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या कुटुंबामध्ये मतभेद झाले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

गतवर्षी सियाचिनमध्ये लष्कराच्या एका तळावर लागलेल्या आगीत सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म आलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून नुकतंच कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते या कीर्तिचक्राचा स्वीकार अंशुमन सिंह यांच्या पत्नी आणि आईने केला होता. मात्र या सन्मानानंतर अंशुमन सिंह यांच्या  कुटुंबामध्ये वादविवाद सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या असून, अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी हुतात्मा अंशुमन यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहे. आमच्या मुलाला हौतात्म्यं आलं. मात्र आता सारं काही सून घेऊन गेली, असा आरोप त्यांनी केली आहे.  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हुतात्मा अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि आई मंजू देवी यांनी ५ जुलै रोजी कीर्ती चक्र सन्मानाचा स्वीकार केला होता. मात्र नंतर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेवर गंभीर आरोप केले.  ते म्हणाले की, आमच्या मुलाला वीरमरण आलं. मात्र आम्हाला काही मिळालं नाही. सन्मान आणि मदत म्हणून मिळालेली रक्कम सून घेऊन गेली. आमचा मुलगाही गेला आणि सूनही गेली.अंशुमन सिंह यांचे वडील रवी प्रताप सिंह यांनी यावेळी सांगितले की, ‘नेक्ट टू किन’साठी ठरवण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीची चर्चा केली आहे. त्याशिवाय दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीवेळीही मी यामध्ये बदल करण्याविषयी बोललो होते. वीरमरण येण्यापूर्वी पाच महिने आधीच माझ्या मुलाचं लग्न झालं होतं. त्याला मुलबाळ नाही. त्यामुळे आज आमच्याकडे त्याच्या फोटोशिवाय काहीही उरलेलं नाही. दरम्यान, अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी दावा केला की, त्यांची सून आता त्यांना सोडून गेली आहे. तसेच तिने आपला पत्ताही बदलला आहे. कीर्तिचक्र स्वीकारताना अंशुमनची आई सोबत होती. मात्र आता आमच्या मुलाच्या फोटोवर लावण्यासाठी आमच्याकडे काहीही नाही आहे. आमच्यासोबत जे काही घडलंय, ते कुणासोबतही घडता कामा नये. मात्र हुतात्मा अंशुमन सिंह यांच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांच्या पत्नीकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानFamilyपरिवार