शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 16:58 IST

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' शब्दांवरून संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला.

नवी दिल्लीः राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' शब्दांवरून संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी या विधानावरून माफी मागण्यास नकार दिल्यानं भाजपानं आता त्यांच्यावर विखारी टीका केली आहे. भाजपाचे चंपारण्यमधील भाजपा खासदार संजय जयस्वाल यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर घणाघात केला आहे. चाणक्य यांनी केलेल्या विधानाचा हवाला देत त्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.2000 वर्षांपूर्वी विष्णुगुप्त चाणक्य यांनी म्हटलं होतं की, परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही. लोकसभेत स्मृती इराणी आणि इतर भाजपा खासदारांनी राहुल गांधींच्या विधानाचा जोरदार विरोध केलेला आहे. याचदरम्यान भाजपा खासदार जयस्वाल यांनी उभं राहून राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?, असं जयस्वाल म्हणाले आहेत. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. असं विधान करणाऱ्या नेत्याला संसदेचा सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचंही निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत.संसदेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींनी रेप इन इंडियावरून माफी मागण्यास नकार दिला. दिल्ली रेप कॅपिटल झाल्याचं विधान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे. ती व्हिडीओ क्लिप मी ट्विटरवर शेअर करेन, असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर लगेचच त्यांनी मोदींच्या त्या विधानाची क्लिप ट्विटदेखील केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्य भारत पेटला आहे. त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपानं रेप इन इंडियाच्या विधानावरुन वाद निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajnath Singhराजनाथ सिंहNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRapeबलात्कार