शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! वडिलांचा गळा कापल्यानंतर फेव्हिक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 13:41 IST

आरोपी मुलाने वडिलांचा गळा कापल्यानंतर फेव्हिक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे

लखनऊ - तुम्ही फेव्हिक्विकची जाहिरात तर पाहिली असेलच. 'चुटकी मे चिपकाए' असा दावा  फेव्हिक्विकच्या जाहिरातीतून केला जात असतो. अनेकजण जाहिरातींवर आंधळा विश्वास ठेवत जे काही सांगितलं जात ते खरं असल्याचं मानतात. पण आपण कोणत्या गोष्टीसाठी ती वस्तू वापरत आहोत याचंही भान असावं लागतं. उत्तर प्रदेशात अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका आरोपी मुलाने वडिलांचा गळा कापल्यानंतर फेव्हिक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न केला. यातना होत असल्याने जोरजोरात ओरडणा-या आपल्या वडिलांचा आवाज शेजा-यांना ऐकू जाऊ नये म्हणून आरोपी मुलाने टीव्हीचा आवाज वाढवला होता. गळा चिकटत नसल्याचं पाहून तो घाबरला आणि वडिलांना त्याच अवस्थेत सोडून पळ काढला. 

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोनहा पोलीस स्टेशनअंतर्गत येणा-या परिसरात रामदेव मिश्र यांचं घर आहे. रामदेव रेल्वेत काम करत होते. रिटायर्ड झाल्यानंतर ते घरीच होते. त्यांच्या पत्नीचं निधन झालं असून, ते आपला मुलगा जगदीश, सून आणि दोन नातवंडांसोबत राहत होते. 

शनिवारी रामदेव आपल्या घरातील खोलीत झोपले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा जगदीश अचानक आला आणि त्यांच्या गळ्यावर चाकू फिरवला. जगदीश सोबत फेव्हिक्विक घेऊन आला होता. वडिलांचा गळा कापल्यानंतर त्याने फेव्हिक्विकने तो जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रामदेव यांना यातना होऊ लागल्याने ते ओरडू लागले. पण निर्दयी मुलाने टीव्हीचा आवाज वाढवला, ज्यामुळे त्यांचा आवाज कोणाला ऐकू जाऊ नये. 

बराच वेळ फेव्हिक्विकने जगदीश वडिलांचा गळा चिकटवण्याचा प्रयत्न करत राहिला. पण जेव्हा असं होऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं ते व्हा मात्र वडिलांना त्याच अवस्थेत सोडून त्याने पळ काढला. जाताना त्याने बाहेरुन रुम लॉक केला. 

रामदेव यांचा आवाज ऐकल्यानंतर शेजा-यांना काहीतरी गडबड असल्याची शंका आली. घरात गेले असता रामदेव रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. लोकांनी त्यांना रुग्णालयात नेलं. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जगदीश सध्या बेरोजगार आहे. 2005 मध्ये त्याने आपल्या पत्नीला छतावरुन ढकलून हत्या केली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं होतं. दुस-या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत'. आरोपी मुलगा जगदीश सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेतली आहे. 

टॅग्स :Murderखून