शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सोमनाथ भारतींच्या आई सूनबाईच्या पत्रपरिषदेत

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत चांगलेच महानाट्य पाहायला मिळाले. सोमनाथ यांच्या आई मनोरमा राणी भारती अचानक पत्रपरिषदेला पोहोचल्या. आपला मुलगा आणि सून एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतील तर मी वृद्धाश्रमात राहायला तयार आहे, असे त्यांनी यावेळी जाहीर करून टाकले.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत चांगलेच महानाट्य पाहायला मिळाले. सोमनाथ यांच्या आई मनोरमा राणी भारती अचानक पत्रपरिषदेला पोहोचल्या. आपला मुलगा आणि सून एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतील तर मी वृद्धाश्रमात राहायला तयार आहे, असे त्यांनी यावेळी जाहीर करून टाकले.
लिपिकांनी पतीकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची तक्रार दिल्ली महिला आयोगाकडे नोंदवली आहे. या तक्रारीत लिपिकांनी सासूकडूनही छळ होत असल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर लिपिकांनी सोमवारी पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. पत्रपरिषद सुुरू असतानाच लिपिकाच्या सासूबाई आपल्या वकिलासह या ठिकाणी पोहोचल्या. माझ्यामुळे माझी सून माझ्या मुलासोबत राहू इच्छित नसल्याचे मला कळले. माझ्यासाठी निश्चितपणे हे वेदनादायी आहे. पण मुलगा आणि सून एकत्र गुण्यागोविंदाने नांदणार असतील तर त्यांच्या सुखासाठी मी वृद्धाश्रमात राहायला तयार आहे, असे त्या म्हणाल्या. अलीकडे मी आईला घराबाहेर काढावे, अशी लिपिकाची इच्छा असल्याचा दावा सोमनाथ यांनी केला होता.

बॉक्स
लिपिका यांचे नवे आरोप
सोमनाथ भारती यांनी निवडणुकीदरम्यान सादर प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्या पत्नी लिपिका भारती यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. दिल्लीत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना भारतींनी मला ई-मेल करून माझी माहिती मागवली होती. मात्र मी या ई-मेलचे कुठलेही उत्तर दिले नव्हते. यानंतर सोमनाथ यांनी स्वत:च्या प्रतिज्ञापत्रात माझ्या स्वाक्षरीशिवाय माझे बँक खाते आणि कर्जाबाबत माहिती भरली. ही माहिती खोटी आहे आणि याचा तपास व्हायला हवा, असे लिपिका यावेळी म्हणाल्या. मी तक्रार केल्यापासून सोमनाथ यांनी माझ्यावर मी भाजपासाठी काम करीत असल्याचा आरोप चालवला आहे. मी हे सर्व पोलिसांच्या इशाऱ्यावर करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केजरीवाल यांच्याकडेही मी सोमनाथ यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे, असेही लिपिकांनी सांगितले.