शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कधी कधी व्यभिचार, तरी पोटगीचा अधिकार; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 08:08 IST

प्रदीप कुमार आणि दीपिका यांचा विवाह २००० मध्ये झाला. त्यांना दोन मुलेही झाली. पुढे त्यांच्यात वाद होऊन एकमेकांविरुद्ध फौजदारी, दिवाणी खटले, तक्रारी आणि एफआयआर दाखल करण्यात आले. अशातच अतिरिक्त प्रधान न्यायाधीश दिल्ली यांनी दीपिकाला १५ हजार रु. महिना पोटगी देण्याचा आदेश दिला.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : अधूनमधून पत्नीने एकांतात केलेला व्यभिचार म्हणजे "व्यभिचारात जगणे" नाही. या कारणावरून घटस्फोटानंतर महिलेला पोटगीपासून वंचित ठेवता येणार नाही, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे.

प्रदीप कुमार आणि दीपिका यांचा विवाह २००० मध्ये झाला. त्यांना दोन मुलेही झाली. पुढे त्यांच्यात वाद होऊन एकमेकांविरुद्ध फौजदारी, दिवाणी खटले, तक्रारी आणि एफआयआर दाखल करण्यात आले. अशातच अतिरिक्त प्रधान न्यायाधीश दिल्ली यांनी दीपिकाला १५ हजार रु. महिना पोटगी देण्याचा आदेश दिला.

पोटगीच्या या आदेशाला पतीने हायकोर्टात आव्हान दिले. पत्नीच्या व्यभिचाराचा मुद्दा बनवत कलम १२५(४) सीआरपीसीनुसार हे आव्हान देण्यात आले. पंकज आर्य यांच्या सोबत ती पती-पत्नीप्रमाणे व्यभिचारात जगते, असा आरोप करण्यात आला. कायद्याने पत्नीवर व्यभिचाराचा आरोप केल्यास तो सिद्ध करण्याची जबाबदारी पतीवर येते. पंकज आणि दीपिका यांच्यात जवळीक असली तरी ते पती -पत्नीप्रमाणे एकत्र राहत असल्याचे सिद्ध करण्यात पतीला यश आले नाही. त्यामुळे हायकोर्टाने व्यभिचाराचा युक्तिवाद नाकारला. 

पत्नी व्यभिचारात जगत आहे हे पतीने निश्चित पुराव्यासह सिध्द केले पाहिजे. एकटेपणात व लपून कधी कधी केलेला व्यभिचार म्हणजे व्यभिचारात जगणे नाही, असे मत हायकोर्टाने व्यक्त केले.

काय म्हणाले न्यायालय?- १२५ (४) सीआरपीसी : कोणतीही पत्नी जर ‘व्यभिचारात जगत’ असेल तर ती पतीकडून पोटगी मिळण्यास पात्र ठरत नाही. - ‘व्यभिचारात जगणे’ म्हणजे काय हे विविध न्यायालयांनी वेळोवेळी परिभाषित केले आहे. गुपचूप व अधूनमधून केलेला व्यभिचार म्हणजे ‘व्यभिचारात जगणे’ ठरत नाही. - पत्नी, मुले आणि पालक निराधार होऊ नयेत याची हमी देण्यासाठी कायद्यात पोटगीची तरतूद आहे. हे कल्याणकारी कायदे आहेत; परंतु काहीतरी मुद्दा पुढे करून या दायित्वापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे ही अलीकडील प्रथा बनली आहे.-न्यायमूर्ती चंद्र धारी सिंग, दिल्ली उच्च न्यायालय 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय