आवर्जुन पाहावे असे काही
By admin | Updated: January 23, 2015 01:04 IST
आवर्जुन पाहावे असे काही
आवर्जुन पाहावे असे काही
आवर्जुन पाहावे असे काहीविहिंपच्या सुवर्ण जयंतीनिमित्त कार्यक्रमनागपूर : विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त मातृशक्ती कल्याण केंद्र विदर्भ प्रदेशतर्फे २४ जानेवारीला शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या संचालिका सोनाली देशपांडे, निवृत्त फ्लाईंग ऑफिसर आणि प्रहार समाज जागृती संस्थेच्या विश्वस्त शिवाली देशपांडे उपस्थित राहतील. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय महिला केद्रीय मंत्री मीनाक्षी पेशवे, केंद्रीय उपाध्यक्षा मीना भट यांचे मार्गदर्शन होणार आहे. विदर्भ कनेक्टच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळानागपूर : विदर्भ कनेक्ट या विदर्भवादी संघटनेतर्फे विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्यासाठी २४ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी ४ पर्यंत रविभवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत विदर्भ कनेक्टचे जिल्हा निहाय कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी विदर्भातील ११ जिल्ह्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.