शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:15 IST

शाह म्हणाले की, "बंगालमध्ये सध्या काही लोकांना चार लग्न करण्याची सूट आहे, मात्र भाजप सत्तेत आल्यास, 'यूसीसी' लागू करून यावर कायमची बंदी घातली जाईल. सर्वांसाठी कायदा समान असायला हवा की नको?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केला.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर येथे जाहीर सभा घेत तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार हल्ला करत कडाडून टीका केली. या सभेत त्यांनी राज्यात समान नागरिक संहिता (UCC) लागू करण्याच्या भाजपच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. शाह म्हणाले की, "बंगालमध्ये सध्या काही लोकांना चार लग्न करण्याची सूट आहे, मात्र भाजप सत्तेत आल्यास, 'यूसीसी' लागू करून यावर कायमची बंदी घातली जाईल. सर्वांसाठी कायदा समान असायला हवा की नको?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केला.

शाह म्हणाले, आम्ही आमचे संकल्प पत्र जाहीर केले आहे. ५ मे रोजी भाजपचे सरकार आल्यास राज्यात मोठा बदल दिसेल. भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत त्यंनी आरोप केला की, राज्य सरकारमधील भ्रष्टाचारामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही. तसेच, भाजपचे सरकार आल्यास राज्यातील महिला दिवस-रात्र स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे काम करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"जनता आता या बॉम्बचे उत्तर मतांनी देईल" -बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना अमित शाह म्हणाले, "गेल्या १५ वर्षांत टीएमसीने बंगालला बॉम्ब आणि गोळ्यांचे कोठार बनवले. मात्र, जनता आता या बॉम्बचे उत्तर मतांनी देईल आणि राज्यात 'डबल इंजिन' सरकार स्थापन होईल." त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर बहुसंख्यक समुदायाला घाबरवण्याचा आणि तुष्टीकरणाचाही आरोप केला. 

"...तर ४ मे नंतर त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात येईल" -दरम्यान, मुर्शिदाबादमधील दंगे आणि रामनवमीच्या मिरवणुकीवरील हल्ल्यांचा उल्लेख करत शाह यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आहे. "मतदानाच्या दिवशी टीएमसीच्या गुंडांनी घरातच राहावे, अन्यथा ४ मे नंतर त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात येईल." असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Shah Promises UCC in Bengal, Ending 'Four Marriage' Loophole.

Web Summary : Amit Shah, campaigning in Bengal, promised to implement a Uniform Civil Code (UCC) if BJP wins, ending the allowance of four marriages for some. He criticized TMC for corruption and poor law and order, promising safety and development under BJP rule. Shah warned TMC goons of jail after May 4.
टॅग्स :Amit Shahअमित शाहMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६