शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

भारतातील काही रहस्यमय ठिकाणं

By admin | Updated: May 12, 2016 18:22 IST

भारत देश त्याच्या रहस्यमय गोष्टींमुळे नेहमीच अख्ख्या जगाला भुरळ घालत असतो

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12- भारत देश त्याच्या रहस्यमय गोष्टींमुळे नेहमीच अख्ख्या जगाला भुरळ घालत असतो. भारतात अनेक राजे-रजवाडे होऊन गेले. अनेक महाल आणि रहस्यमय किल्ले इथं आजही स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. ते किल्ले आणि ठिकाणांमधील रहस्यमयी गोष्टींचं कोडं उलगडण्यास विज्ञानालाही आजमितीस जमलं नाही. विज्ञानाच्या जोरावर मनुष्यानं चंद्रावर जरी झेप घेतली तरी काही रहस्यमय गोष्टींच्या बाबतीत त्याला झुकावेच लागले आहे. भारतात अशाच काही रहस्यमय जागा आहेत. ज्या आजच्या युगातही रहस्यांनी भारलेल्या आहेत. या ठिकाणांवरील रहस्य जाणून घेण्यासाठी दररोज देश-विदेशातील पर्यटक इथं आवर्जून भेट देतात. अशीच काही रहस्यमय ठिकाणं आम्हीही तुमच्यासाठी शोधून काढली आहेत.
 
भारतातील रहस्यमय ठिकाणं   
पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या- आसाम
आसाम हे राज्य चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र आसाममध्ये काही रहस्यमय गोष्टी घडतात. आसाममधील जतिंगा गावात एकाच वेळी हजारो पक्षी आत्‍महत्‍या करतात. हे पक्षी सप्‍टेंबर, ऑक्‍टोबर महिन्‍यात विदेशातून हजारो मैलाचा सुरक्षित प्रवास करून या गावापर्यंत विनाअडथळा, डोंगर, दऱ्या पार करून येतात. मात्र ते इथेच येऊन असे का मरतात, हे कोडं पक्षी मित्रांनाही अजून उलगडलेलं नाही.
 
उंदरांचं मंदिर - करणी माता मंदिर, राजस्थान 
बिकानेरपासून ३० किलोमीटर अंतरावर असणारं हे मंदिर २०,००० उंदरांचं घर आहे. इतकंच नाही तर इथे उंदरांची पूजाही केली जाते. हे उंदीर म्हणजे देवीचा अवतार असल्याचं इथे मानलं जातं. 
 
लोकतकचा तरंगता तलाव - मणिपूर
मणिपूरचा लोकतक तलाव हा जगातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे. या तलावात अनेक अशी बेटं आहेत जी तरंगत राहतात. माणसं या बेटांवर शेती करतात. तसेच तेथे जगातील काही दुर्मिळ प्राणीही आढळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या बेटांना भेट देतात. 
 
रुपकुंड तलाव - उत्तराखंड 
उत्तराखंडात हिमालयाच्या कुशीत १६,५०० फुटांवर रुपकुंड तलाव आहे. इथे कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती अस्तित्वात नाही. तरीही इथे नवव्या शतकातले ६०० मानवी सांगाडे सापडले आहेत. हे सांगाडे इथे कसे आले त्याची कोणालाही माहिती नाही.
 
कोलकात्यातील वडाचे झाड
कोलकत्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये असलेले हे वडाचे झाड म्हणजे एक आश्चर्य आहे. हे वडाचे झाड म्हणजे एक जंगलच आहे. ते २०० वर्षं जुने आहे. ते इतके पसरले आहे की त्याचा परीघ जवळपास २ किलोमीटर इतका प्रचंड आहे. 
 
चुंबकीय टेकडी - लडाख 
लेह लडाख येथे असलेली चुंबकीय टेकडी हे एक मोठे आश्चर्य आहे. इथे एका विशिष्ट जागी न्यूट्रल गीअरमध्ये गाडी उभी केल्यास ती आपोआप या टेकडीकडे आकर्षित असल्याचं बोललं जातं. 
 
 कोडीन्ही गाव - केरळ
केरळमधील या २००० लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल ३५० जुळ्यांचा जन्म झाला आहे. दर १००० लोकांमागे ४२ जुळ्यांचा जन्म या गावात नोंदवला गेला आहे. 
 
 
पंबन बेटावरचे तरंगते दगड - रामेश्वरम
रामेश्वरमनजीकच्या पंबन बेटावरुन रामाने रामसेतू बांधला अशी आख्यायिका आहे. याच बेटावर असे काही दगड आढळतात जे पाण्यावर तरंगतात. रामाने सेतू बांधण्यासाठी हेच दगड वापरले असावेत अशी समजूत आहे.
 
लटकते खांब - लेपक्षी, आंध्र प्रदेश 
आंध्र प्रदेशातील लेपक्षी मंदिरातील ७० खांबांपैकी एक खांब असा आहे जो कोणत्याही आधाराशिवाय लटकतो. या खांबाच्या खालून एखादा कपडा किंवा ओढणीही आरपार जाऊ शकतो.