नवीन पनवेलमधील नागरी समस्या सोडवा
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
नगराध्यक्षांचे सिडकोला पत्र : लवकर कार्यवाहीची मागणी
नवीन पनवेलमधील नागरी समस्या सोडवा
नगराध्यक्षांचे सिडकोला पत्र : लवकर कार्यवाहीची मागणीपनवेल : नवीन पनवेलमधील विविध समस्या सोडविण्यासाठी पनवेल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी सिडकोला पत्र लिहून लवकरात लवकर या नागरी समस्या मार्गी लावाव्यात, अशी विनंती केली आहे. सिडको प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणार्या नगरपरिषद क्षेत्रामधील नवीन पनवेल शहरामधील या समस्या आहेत. या समस्या लवकर सोडवण्याची विनंतर घरत यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना केली आहे. यामध्ये पोदी याठिकाणचे दोन टॉयलेट सिडकोच्या डे्रनेजला जोडून देणे, नवीन पनवेलमधील सेक्टर १५, १६ मधील फुटपाथ दुरुस्त करणे, पोदी गावासाठी एक समाज मंदिर बांधणे, सिडको परिसरातील सर्व झोपड्यांना शासनाच्या धोरणानुसार पुनर्वसन करून देणे, पोदी, छोटा खांदा, मोठा खांदा यांना बांधकाम परवानगी देण्यात यावी, तसेच शहरातील नादुरुस्त रस्ते, कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)