शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चेद्वारेच काढणार तोडगा, पंतप्रधान मोदी; खुल्या मनाने संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 04:41 IST

Narendra Modi News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चेद्वारेच तोडगा काढण्याचा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीसांगितले.दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये भीषण हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर तसेच संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी आयोजिलेल्या सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत मोदी बोलत होते.या बैठकीच्या कामकाजाची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली. नव्या कृषी कायद्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार अत्यंत खुल्या मनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. आमची याआधीही हीच भूमिका होती, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसाचाराबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. हा हिंसाचार करणाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली. त्या घटनेचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. संसदेतील अडथळ्यांमुळे छोट्या पक्षांची अडचणपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेमध्ये कामकाजात अडथळे आल्याने छोट्या पक्षांची विलक्षण अडचण होते. या पक्षांना त्यांचे विषय संसदेत मांडण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मोठ्या पक्षांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालेल, यासाठी सहकार्य केले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण