शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

...म्हणून शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत; पंतप्रधान माेदींनी 'दुखरी' नस छेडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 07:15 IST

स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात भारताच्या विकास यात्रेत मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान नितांत महत्त्वाचे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीला संबोधताना व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  आगामी लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र मिळून लढावी. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जे पक्ष जोडले जातील, त्यांना जनतेच्या कल्याणासाठी एकत्र आणावे, असे आवाहन करत काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवार कधीच देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असे मत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते नवे महाराष्ट्र सदन येथे आयोजित केलेल्या भाजप रालोआ खासदारांच्या बैठकीत बोलत होते.

स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात भारताच्या विकास यात्रेत मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान नितांत महत्त्वाचे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीला संबोधताना व्यक्त केले. या बैठकीला महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या खासदारांसह १३ मंत्री,  ६१ खासदार उपस्थित होते.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, रामदास आठवले, डॉ. भारती पवार, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड या बैठकीत सामील झाले होते. याशिवाय शिवसेनेचे सर्व तेरा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हेही बैठकीला उपस्थित होते.

भाजप काँग्रेससारखा अहंकारी पक्ष नाहीभाजप काँग्रेससारखा अहंकारी पक्ष नाही. २०१४ ते २०१९ दरम्यान शिवसेना महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होता; पण ‘सामना’मधून आमच्या सरकारवर सतत बिनबुडाची टीका करून अनावश्यक वाद निर्माण केले गेले. तरीही आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही नव्हे तर शिवसेनेने आमची युती तोडली.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारprime ministerपंतप्रधान