शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

...म्हणून मी रात्रभर झोपलो नाही; बिपीन रावत यांना पाहणाऱ्या शिव कुमारने अश्रू ढाळत व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 19:35 IST

Eyewitness Claims He Saw General Rawat After Crash : काल दुपारी निलगिरीतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळले. शिव कुमारचा दावा आहे की, त्यांनी वायुसेनेचे हेलिकॉप्टर आगीत फुटताना आणि पडताना पाहिले. त्याने व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुन्नूर - तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या अपघाताच्या ठिकाणी एका साक्षीदाराने जनरल बिपिन रावत यांना पाहिल्याचा दावा शिव कुमार यांनी केला. टेकड्यांमध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष सापडल्यानंतर त्याने जनरल रावत यांना जिवंत पाहिले. शिव कुमार हा कंत्राटदार असलेल्या भावाला भेटायला गेला होता, तो चहाच्या मळ्यात काम करतो. 

काल दुपारी निलगिरीतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळले. शिव कुमारचा दावा आहे की, त्यांनी वायुसेनेचे हेलिकॉप्टर आगीत फुटताना आणि पडताना पाहिले. त्याने व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली.शिवकुमार यांनी एनडीटीव्हीला सांगितले, "आम्ही तीन मृतदेह पडलेले पाहिले... एक माणूस जिवंत होता. त्याने पाणी मागितले. आम्ही त्याला बेडशीटमध्ये गुंडाळून बाहेर काढले आणि नंतर त्यांना बचाव करणारे पथक घेऊन गेले," शिव कुमारने एनडीटीव्हीला सांगितले.शिव कुमार पुढे म्हणाला तीन तासांनंतर, कोणीतरी त्याला सांगितले की, तो ज्या माणसाशी बोलत होता ते जनरल बिपिन रावत होते आणि त्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा फोटो दाखवण्यात आला, त्यावेळी शिव कुमारला बिपीन रावत यांची ओळख पटली. "या माणसाने देशासाठी इतकं केलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता... आणि मी त्यांना पाणीही देऊ शकलो नाही. त्यामुळे मला रात्रभर झोप लागली नाही," असं शिव कुमार अश्रू ढाळत म्हणाला.कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दलाच्या तळावरून वेलिंग्टनला जात असताना हेलिकॉप्टर कोसळल्याने जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य ११ जण मृत्युमुखी पडले.  ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावलेले आहे, ज्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात गंभीर भाजल्यामुळे उपचार सुरू आहेत. राजनाथ सिंह यांच्या म्हणण्यानुसार ते लाइफ सपोर्टवर आहेत.Mi17 V5 हेलिकॉप्टरने बुधवारी सकाळी ११. ४८ वाजता सुलूर हवाई तळावरून उड्डाण केले आणि दुपारी 12:15 पर्यंत वेलिंग्टन येथे उतरणे अपेक्षित होते. मात्र दुपारी १२.०८ च्या सुमारास हेलिकॉप्टर रडारपासून दूर गेले. ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला आहे आणि हेलिकॉप्टर का कोसळले हे समजण्यास तपासकर्त्यांना मदत होऊ शकते.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना