शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून विधानसभा उपाध्यक्षांनी मुलाच्या तोंडात कोंबले नोटांचे बंडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 15:02 IST

एका लहान मुलाच्या तोंडात पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल कोंबल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हैदराबाद - एका लहान मुलाच्या तोंडात पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल कोंबल्याने  तेलंगाणा विधानसभेचे उपाध्यक्ष टी. पद्मा राव हे अडचणीत आले आहेत. टी. पद्मा राव यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एका कार्यक्रमात ड्रम वाजवत असलेल्या एका मुलाच्या तोंडात नोटांचे बंडल कोंबताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सिकंदराबादमध्ये आयोजित बोनालू उत्सवादरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पद्मा राव हे या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्सवामध्ये एक मुलगा ड्रम वाजवत होता. त्यावेळी राव यांनी पाचशे रुपयांचे एक बंडल खिशातून काढून या मुलाच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सदर मुलाने हे बंडल तोंडातच पकडून ड्रम वाजवणे सुरूच ठेवले. मग राव यांनी शेजारी उभे राहून त्याचे ड्रम वादन पाहिले.दरम्यान, टी. पद्म राव यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. या कृतीमुळे मुलगा गुदमरला असता. प्रसंगी त्याचा जीवही गेला असता, असा आरोप काही लोकांनी केला आहे. मात्र आपण काहीही चुकीचे केलेले नाही, असे स्पष्टीकरण राव यांनी दिले आहे. ''हा तेलंगाणाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. मी या मुलाला पैसे देऊन प्रोत्साहित केले आहे. इतकेच नाही तर भारतातील विवाह सोहळ्यांमध्ये देखील ही प्रथा आहे. तो मुलगा ज्याप्रकारे ड्रम वाजवत होता, ते पाहून मी भारावून गेलो. म्हणून मी त्याला बक्षीस दिले,'' असे राव म्हणाले.  जर मी नोटांचे बंडल जाळले असते किंवा अन्य प्रकारे नष्ट केले असते तर तो गुन्हा ठरला असता. पण कुठल्याही मुलाला बक्षिस देणे हा गुन्हा आहे का? असा सवालही, राव यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारण