श्रीनगर/चंदीगड : जम्मू-काश्मीरच्या कारगिल भागात तीन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाल्यापासून बेपत्ता असलेल्या एका जवानाचा मृतदेह रविवारी १२ फूट बर्फाखालून बाहेर काढण्यात आला. सियाचीनमध्ये अशाच हिमस्खलनात नऊ जवान शहीद झाल्यानंतरची ही दुसरी घटना आहे.‘लष्कराच्या बचाव पथकाने सलग तीन दिवसांपर्यंत शोधमोहीम राबविल्यानंतर विजयकुमार के. या जवानाचा मृतदेह बाहेर काढला. हिमस्खलनानंतर विजयकुमारचा मृतदेह १२ फूट बर्फाखाली गाडला गेला होता,’ अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिली. खराब हवामान असतानाही गेल्या तीन दिवसांपासून शोधमोहीम राबविली जात होती. जेथे हिमस्खलन झाले होते तेथे १५ फुटापर्यंत बर्फ साचलेला आहे. श्वान पथक, रडार आणि धातुशोधक यंत्रांच्या मदतीने या जवानाचा मृतदेह शोधण्यात आला.विजयकुमार हा तामिळनाडूच्या थिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील वल्लारामपूरमचा राहणारा आहे. त्याच्या मागे आई-वडील आणि दोन बहिणी आहेत.
जवानाचा बर्फाखालील मृतदेह बाहेर काढला
By admin | Updated: March 21, 2016 02:47 IST