शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

गुजरातमध्ये धुसफूस : भाजपा सोडून या, काँग्रेसकडून मानाचे पद देऊ; नितीन पटेल यांना आॅफर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:41 IST

आधीपेक्षा कमी बहुमताने सलग सहाव्या वेळा सत्तेवर आलेल्या गुजरातमधील भाजपाच्या नव्या सरकारमध्ये शपथविधीनंतर लगेचच धुसफूस सुरू झाली आहे. महत्त्वाची खाती न मिळाल्याने उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज झाले आहेत.

अहमदाबाद : आधीपेक्षा कमी बहुमताने सलग सहाव्या वेळा सत्तेवर आलेल्या गुजरातमधील भाजपाच्या नव्या सरकारमध्ये शपथविधीनंतर लगेचच धुसफूस सुरू झाली आहे. महत्त्वाची खाती न मिळाल्याने उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराजझाले आहेत. तर त्यांना गळाला लावण्याच्या उद्देशाने पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी ‘आमदारांसह भाजपा सोडणार असाल तर काँग्रेसला सागून महत्त्वाचे पद मिळवून देऊ’, अशी खुली आॅफर नितीन पटेल यांना दिली आहे.आधीच्या मंत्रिमंडळातही नितीन पटेल उपमुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे वित्त, नगरविकास व पेट्रोलियम अशी महत्वाची खाती होती. नव्या मंत्रिमंडळात त्यांचे पद कायम राहिले पण त्यांना पूवीर्ची खाती न देता तुलनेने दुय्यम खाती दिली गेली आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री पटेल नाराज झाले असून त्यांनी आपील नाराजी पक्षश्रेष्ठींनाही कळविली आहे.शपथविधीनंतर इतर सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारला. मात्र नितीन पटेल यांनी अद्याप त्यांना दिलेल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही. गेले दोन दिवस सचिवालयातील कार्यालयातहीते फिरकलेले नाहीत.सत्ताधारी पक्षात अशी धुसफूस सुरु असताना दुसरीकडे पाटीदार अमानत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी गळ टाकला आहे. गुजरात निवडणूक निकालांची चिकित्सा करण्यासाठी पाटीदार आंदोलन समितीचे चिंतन शिबिर बतोट येथे सुरु झाले. तेथे पत्रकारांशी बोलताना हार्दिक पटेल यांनी नाराज उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले आवाहन केले.हार्दिक पटेल म्हणाले की, नितीन पटेल १० आमदारांसोबत भाजपा सोडणार असतील तर त्यांच्या पाठीशी उभे राहायला आम्ही तयार आहोत. त्यांचे स्वागत करून त्यांना योग्य पद देण्याविषयी मी काँग्रेसशी बोलेन! भाजपा सन्मानाने वागवत नसेल तर ते आमच्यासोबत येऊ शकतात, असेही हा तरुण नेता म्हणाला.नितीन पटेल हे आमचेही ज्येष्ठ नेते आहेत. पक्षासाठी त्यांनी खूपकष्ट घेतले आहेत. त्यामुळेप्रत्येकाने त्यांना मदत करायला हवी, अशी पुस्तीही हार्दिक पटेल यांनी जोडली. (वृत्तसंस्था)काँग्रेसचे घडामोडींवर लक्ष आहे. आधी आनंदीबेन पटेल यांच्यानंतर आता नितीन पटेलना भाजपाच्या नेतृत्वाने टार्गेट केले आहे. नितीनभाई व काही भाजपा खसदारांची साथ लाभली तर गुजरातच्या हितासाठी आम्ही कदाचित सरकारही स्थापन करू.- भरतसिंह सोलंकी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, गुजरातवित्त मंत्रालय दुसºयाला दिले याचा अर्थ तो मंत्री मंत्रिमंडळात दुसºया क्रमांकाचा झाला, असे होत नाही. नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री आहेत व त्यांचे स्थान दुसºया क्रमांकाचेच आहे.- विजय रुपाणी, मुख्यमंत्री गुजरात

टॅग्स :GujaratगुजरातNitin Patelनितीन पटेल