शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CBSE Result : स्मृती इराणींच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 94 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 18:57 IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहर यानेही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहर यानेही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत जोहरने 91 टक्के गुण मिळविले आहे. याबाबत स्मृती इराणी यांनी ट्विटकरुन आपला आनंद व्यक्त केला आहे.

स्मृती इराणी यांनी आपल्या मुलाच्या यशाचा आनंद सगळ्यांशी शेअर करत म्हटले आहे, 'माझा मुलगा जोहर याचा मला अभिमान आहे. वर्ल्ड केम्पो चॅम्पियनशिपमध्ये त्याला ब्राँझ मेडल तर मिळालेच शिवाय बारावीच्या परीक्षेतही त्याने कमाल करून दाखवली. चार विषयात 91 टक्के मिळाले आहेत. खास करून अर्थशास्त्रामध्येही त्याला 94 टक्के गुण मिळाले.' 

याशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुल्कीत केजरीवाल यानेही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पुल्कीत केजरीवाल याला बारावीच्या परिक्षेत 96.4 टक्के मिळाल्याचे ट्विट केले आहे. 

देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण 79.5 टक्के इतके आहे. या परीक्षेत हंसिका शुक्ला या विद्यार्थिनींने पहिला क्रमांक पटकावला आहे. हंसिकाबरोबरच करिश्मा अरोरा ही विद्यार्थिनीही परीक्षेत टॉपर ठरली आहे. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. 

यंदा 10 विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले. 

(५०० पैकी ४९९ गुण... CBSE टॉपर हंसिकाचा एक गुण गेला कुठे?)

सीबीएसईचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती विद्यार्थी, पालकांना नव्हती. सीबीएसईचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती अचानक आज दुपारी आली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना आश्चर्याचा धक्का बसला. याआधी सीबीएसईचे निकाल विविध टप्प्यांमध्ये जाहीर व्हायचे. मात्र यंदा सर्व विभागांचे निकाल सीबीएसईकडून एकाचवेळी जाहीर करण्यात आले. जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली होती. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीCBSE Examसीबीएसई परीक्षा