हॅलो ग्रामीणसाठी चोरीचे सव्वा लाखांचे मोबाईल जप्त अल्पवयीन आरोपी : स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
जळगाव: जामनेर शहरातील शास्त्री मार्केट मधील अनिल लालचंद चंदनानी यांच्या शाम ट्रेडर्स या मोबाईलच्या दुकानातून एक लाख २० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका अल्पवयी आरोपीला अटक केली आहे.
हॅलो ग्रामीणसाठी चोरीचे सव्वा लाखांचे मोबाईल जप्त अल्पवयीन आरोपी : स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
जळगाव: जामनेर शहरातील शास्त्री मार्केट मधील अनिल लालचंद चंदनानी यांच्या शाम ट्रेडर्स या मोबाईलच्या दुकानातून एक लाख २० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका अल्पवयी आरोपीला अटक केली आहे.जामनेर येथील अनिल चंदनानी यांच्या मालकीच्या शाम ट्रेडर्स या दुकानातून १ डिसेंबर २०१४ ते १ मार्च २०१५ या दरम्यान विविध कंपनीचे एक लाख २० हजार रुपये किंमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या पथकातील हे.कॉ.उत्तमसिंग पाटील, बापू भोसले, अशोक चौधरी, ईश्वर सोनवणे, नरेंद्र पाटील यांनी फिर्यादी यांच्या मोबाईल दुकानात काम करणार्या अल्पवयीन मुलावर पाळत ठेवली.हा मुलगा दुकानातून मोबाईलची चोरी करून खोटे कारण सांगत मित्राना विक्री करीत असल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार पथकाने या मुलाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख १० हजार रुपये किंमतीचे १५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या आरोपीला पुढील कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.