शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दीपक आरोंदेकर याला अटक सुकूर मारहाण व वाहन मोडतोड प्रकरण

By admin | Updated: February 20, 2016 00:07 IST

पर्वरी : सुकूर येथील बेनेदित नाझारेथ यांना मारहाण करून त्यांच्या कारची मोडतोड करणारा संशयित आरोपी दीपक आरोंदेकर (सुकूर) आणि त्याचा साथीदार भालचंद्र (मयूर) प्रभुदेसाई (म्हापसा) यांना पर्वरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर (क्र. जीए-०३, एन-५२७०) इनोवा वाहनासोबत ताब्यात घेतले. मारहाणीची ही घटना दि. १७ रोजी रात्री घडली होती.

पर्वरी : सुकूर येथील बेनेदित नाझारेथ यांना मारहाण करून त्यांच्या कारची मोडतोड करणारा संशयित आरोपी दीपक आरोंदेकर (सुकूर) आणि त्याचा साथीदार भालचंद्र (मयूर) प्रभुदेसाई (म्हापसा) यांना पर्वरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर (क्र. जीए-०३, एन-५२७०) इनोवा वाहनासोबत ताब्यात घेतले. मारहाणीची ही घटना दि. १७ रोजी रात्री घडली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक आरोंदेकर ही गुन्हेगार प्रवृत्तीची व्यक्ती असून त्याच्यावर यापूर्वी म्हापसा आणि साळगाव पोलीस स्थानकात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तीन वेळा त्याला सुरक्षा राखण्याच्या निमित्ताने अटक केली होती. तसेच त्याच्यावर दोन अजामीनपात्र गुन्हे दाखल असून खटले न्यायप्रविष्ट आहेत. दीपक याने आमदार रोहन खंवटे यांचा माणूस असल्याचे सांगून नाझारेथ यांना अर्वाच्य शिवीगाळ आणि मारहाण करून त्यांच्या वाहनाची मोडतोड केली होती. या प्रकरणामुळे पर्वरी मतदारसंघात राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विरोधकांनी आमदार खंवटे यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी खंवटे यांनी पर्वरी पोलीस स्थानकात जाऊन निषेध व्यक्त करून मारहाण करणार्‍या आरोपीला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साज्जीत पिल्ले आणि राघोबा कामत यांना याकामी लावले होते. त्यांनी शिताफीने महामार्गावर दोघा संशयितांना शुक्रवारी दुपारी ३ वा. इनोवा वाहनासोबत ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)