शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

काश्मीरमध्ये घुसणारे सहा दहशतवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 06:41 IST

प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलाने रविवारी पहाटे हाणून पाडला.

श्रीनगर - प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलाने रविवारी पहाटे हाणून पाडला. या वेळी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. ही घटना काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातल्या केरान क्षेत्रामध्ये घडली.यासंदर्भात कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, पाकिस्तानातून दहशतवाद्यांचा एक गट सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता. सुरक्षा जवानांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कारवाई केली. सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये काही तास चकमक सुरू होती. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांपैैकी कोणी भारतीय हद्दीत प्रवेश केला नाही ना, याचा छडा लावण्यास केरान क्षेत्रातील जंगलभागामध्ये सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली होती. घुसखोरीच्या प्रयत्नात अनेक दहशतवादी आहेत. मात्र, तंगधर येथे मारल्या गेलेल्या पाच घुसखोर दहशतवाद्यांपैैकी दोघे हे काश्मीरमधील पुलवामा व कुलगाम येथील रहिवासी होते.एकतर्फी शस्त्रसंधीनंतर चार घटनारमझानच्या काळात केंद्र सरकारने काश्मीरमध्ये एकतर्फी शस्त्रसंधीची घोषणा १६ मे रोजी केली. त्यानंतर भारतीय हद्दीत दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याच्या चार घटना घडल्या आहेत. हे प्रयत्न सुरक्षा जवानांनी हाणून पाडले असून, त्या वेळी झालेल्या चकमकीत एकूण १७ दहशतवादी ठार झाले आहेत. कुपवाडा जिल्ह्यातील मचिल भागामध्ये घुसखोरी करणाऱ्यातीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.२६ मे रोजी तंगधरयेथे अशाच एका घटनेत झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले. १८ मे रोजी हंडवारा येथे तीन घुसखोर दहशतवादी सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत मरण पावले होते.

टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर