शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध पालकांची आबाळ केल्यास सहा महिने कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:35 IST

वृद्ध पालकांची आबाळ करणाऱ्यांना किंवा त्यांना वाईट वागणूक देणा-यांना सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा विचार आहे

नवी दिल्ली : वृद्ध पालकांची आबाळ करणाऱ्यांना किंवा त्यांना वाईट वागणूक देणा-यांना सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा विचार आहे. सध्या यासाठी तीन महिने कैदेची शिक्षा आहे.वृद्ध पालकांची आबाळ होऊ नये व त्यांचा सांभाळ करणे ही त्यांच्या मुलांची कायदेशीर जबाबदारी ठरावी, यासाठी सरकारने २००७मध्ये ‘मेन्टेनन्स अ‍ॅण्ड वेल्फेअर आॅफ पेरेंट््स अ‍ॅण्ड सीनिअर सिटिझन्स अ‍ॅक्ट’ कायदा केला. केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय याचा फेरआढावा घेत आहे. कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. या दुरुस्त्या करण्यासाठी मंत्रालयाने सुधारित कायद्याच्या विधेयकाचा कच्चा मसुदा तयार केला आहे. संसदेची त्यास मंजुरी मिळताच नवा कायदा लागू होईल. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या मुलांनी पालकांची काळजी घेण्यात हात आखडता घेऊ नये, हे यात पाहिले जाईल. मुलांनी आबाळ केल्यास वा सांभाळ करण्यास नकार दिल्यास पालक कायद्यानुसार स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाकडे न्याय मागू शकतील.सध्याच्या कायद्यात पालकांच्या संदर्भात मुलांच्या व्याख्येत त्यांची मुले व नातवंडे यांचाच समावेश आहे. आता त्यामध्ये दत्तक घेतलेली वा सावत्र मुले, जावई व सून आणि कोर्टाने ज्यांच्यासाठी अभिभावक नेमले आहेत अशी अल्पवयीन मुले यांचाही समावेश होईल. सध्या कोर्टाच्या आदेशाने मुलांकडून पालकांना मंजूर केल्या जाणाºया निर्वाह भत्त्याला दरमहा १० हजार रुपयांची कमाल मर्यादा आहे. दुरुस्तीने ही काढून टाकली जाईल व ही रक्कम मुलांच्या ऐपतीनुसार ठरविली जाऊ शकेल. पालकांना दोन वेळा जेवायला घातले व कपड्यांचे दोन जोड दिले की मुलांची जबाबदारी संपणार नाही. पालकांना राहायला घर, औषधपाणी व आरोग्यसेवा पुरविणे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी हेही मुलांचे कर्तव्य असेल.