शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत दहावी परीक्षेला ६ लाख विद्यार्थ्यांचा रामराम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:35 IST

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत. धक्कादायक अशा या गोष्टीबद्दल चिंता वाटण्याऐवजी उत्तर प्रदेश सरकारने त्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. परीक्षेत कॉपी व इतर गैरप्रकार करणा-यांना सरकारने चाप लावल्यामुळेच हे घडल्याचा दावा उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण खात्याचे दिनेश शर्मा यांनी सांगितले.परीक्षेकडे पाठ फिरविरणा-यांपैकी ८० टक्के विद्यार्थी हे उत्तर प्रदेशमधील नाहीत. ज्या शाळेत ते कधी गेलेच नाहीत, अशा शाळांंमध्ये नोंदणी करून हे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसत असत. विद्यार्थी फक्त परीक्षेच्या वेळीत दिसत. ओस पडलेल्या शाळा जिथे काहीही शिकविले जात नाही, अशा शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेस बसण्यास बंदी घालण्यात आली. असे विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी अनेक गैरप्रकार करीत. एवढेच नव्हे, तर त्यांच्याऐवजी भलत्यांनाच परीक्षेला बसवले जात असे. त्यात पैशाची मोठी उलाढालही होते. या अपप्रवृत्तींना सरकारने यंदा चाप लावला आहे असे उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळानेही म्हटले आहे. परीक्षेत पहिल्या तीन पेपरना ६,३३,२१७ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. परीक्षा पूर्ण होईपर्यंत हा आकडा वाढून साडेसात लाखाच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :examपरीक्षा