शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक पुनीत अग्रवाल यांच्यासह सहा ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:37 IST

स्वत:च्याच फार्महाऊसवर लिफ्ट तळाचा पत्रा निखळून ७० फुटांवरून कोसळली

इंदूर : आठ राज्यांमध्ये हजारो कि.मी. लांबीच्या महामार्गांचे बांधकाम करणाऱ्या ‘प्रकाश अ‍ॅस्फाल्टिंग्ज अ‍ॅण्ड टोल हायवे (पाथ इंडिया)चे व्यवस्थापकीय संचालक व उद्योजक पुनीत अग्रवाल कुटुंब व मित्र परिवारातील पाच जणांसह मंगळवारी रात्री त्यांच्याच फार्महाऊसवर लिफ्ट कोसळून ठार झाले.अग्रवाल यांच्या पाताळपाणी येथील फार्महाऊसवर हा अपघात झाला. त्यात पुनीत अग्रवाल (५३ वर्षे), मुलगी पलक, जावई पलकेश अग्रवाल, नातू नव आणि पलकेश यांचे मुंबईतील मेव्हणे गौरव आणि त्यांचा मुलगा अर्यवीर यांचे निधन झाले. गौरव यांची पत्नी निधी यांची अनेक हाडे मोडल्याने प्रकृती गंभीर आहे.पुनीत अग्रवाल व त्यांचे मित्र ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीसाठी फार्महाऊसवर सहकुटुंब आले होते. परिसरातील निसर्गसौंदर्य उंचावरून पाहता यावे, यासाठी अग्रवाल यांनी परिसरात टॉवर उभारला आहे. ‘कॅप्स्यूल’ लिफ्टने वरच्या प्रेक्षक गॅलरीत जाता येते.अपघात पाहिलेल्यांनी सांगितले की, संध्याकाळी पुनीत अग्रवाल यांच्यासह सात जण लिफ्टने वर गेले. नंतर खाली निघाले. लिफ्टची क्षमता नसल्याने पुनीत यांचा मुलगा निपुण वरच थांबला. सहा जणांना घेऊन लिफ्ट टॉवरवरून खाली येत असता लिफ्टच्या तळाचा पत्रा निखळला व सर्व जण सुमारे ७० फूट उंचीवरून खाली कोसळले.पुनीत यांची पत्नीही सोबत गेली होती. मात्र, ती वर न जाता ते सर्व जण परत येण्याची वाट पाहत खालीच होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व अनेक मान्यवरांनी अग्रवाल कुटुंबावर मृत्यूने घातलेल्या या आकस्मिक घाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. (वृत्तसंस्था)एकाच चितेवर अंत्यसंस्कारबुधवारी महूजवळील मुक्तिधाम स्मशानभूमीत पुनीत अग्रवाल व नातू यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अंत्ययात्रेत आप्त, मित्र व नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी होते. मुक्तिधाम स्मशानभूमी नव्याने बांधण्याचे काम अग्रवाल यांचीच कंपनी करीत आहे. पुनीत यांची कन्या व जावई यांच्यावर इंदूर येथे अंत्यसंस्कार झाले, तर गौरव व आर्यवीर यांचे पार्थिव मुंबईला नेण्यात आले.