शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

बुलंदशहरातील हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:29 IST

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता.

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली; मात्र मुख्य आरोपी व बजरंग दलाचा कार्यकर्ता योगेश राज हा फरार झाला. न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षकाच्या पत्नीला ४० लाख रुपये, त्याच्या पालकांना १० लाख रुपये भरपाई देण्याचे व त्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी सेवेत सामावून घेण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. बजरंग दलासह आणखी एका संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे; मात्र त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. मृत प्राण्यांचे सापडलेले अवशेष गायीचेच आहेत का, याबद्दल निश्चिती झालेली नाही. २०१५ साली दादरी येथे गोहत्या केल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाक याला मारहाण करून ठार मारण्यात आले होते. त्या प्रकरणाचा तपास सुबोधकुमार सिंह यांच्याकडे होता. त्यामुळेच हिंसाचारात त्यांना ठार मारण्यात आले, असा आरोप सुबोधकुमार यांच्या बहिणीने केला. कुटुंबीयांना भरपाई नको आहे. आदित्यनाथ फक्त गोरक्षणाचा धोशा लावत आहेत, असेही तिने उद्वेगाने सांगितले. (वृत्तसंस्था)>संघ परिवारच जबाबदार : मंत्र्याचा आरोपहा हिंसाचार पूर्वनियोजित असून, तो विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रा. स्व. संघ यांनी घडवून आणला, असा आरोप उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील राज्यमंत्री व सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. दरम्यान, मानवाधिकार आयोगाने राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना नोटीस देऊन चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ