सिंगल.... मौदा
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
रेती चोरीवर आळा घाला, तहसीलदारांना निवेदन
सिंगल.... मौदा
रेती चोरीवर आळा घाला, तहसीलदारांना निवेदनमौदा : परिसरातील कन्हान नदीच्या रेतीघाटांवर चोरट्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जाते. याकडे पोलीस प्रशासन व महूसल विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. या दोन्ही विभागाचे रेती चोरीकडे लक्ष पुरवून चोरीवर आळा घालावा, या मागणीसाठी भाजपच्या एका शिष्टमंडळाने तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन सादर केले आहे. परिसरातील कन्हान नदीच्या रेतीघाटावर रात्रीच्या सुमारास रेतीमाफिया गौण खनिज उत्खनन करतात. यावेळी होणाऱ्या वाहतुकीमुळे नागरिकांची झोप उडली जाते. विशेष म्हणजे या रेती वाहतूक करणाऱ्यांकडे कोणतीही रॉयल्टी नसते. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर भुर्दंड पडतो. याकडे पोलीस विभाग व महसूल विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. त्यामुळे ही रेती चोरी थांबवावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. शिष्टमंडळात भाजपचे शहराध्यक्ष रवि बोरसरे, छाया पोटभरे, राधेश्याम वैद्य, पंकज पाठक आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)