शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘नुसते मास्क चालणार नाही’, पंतप्रधानाना ६०० वैज्ञानिकांचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 01:21 IST

व्यापक उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधानाना ६०० वैज्ञानिकांचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केवळ सामाजिक अंतराचे पथ्य पाळून कोविड-१९च्या संसर्गास आळा बसणार नसून तपासण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ करत पॉजिटिव्ह रुग्णांबरोबरच लक्षणविरहित बाधितांचेही विलगीकरण करण्याची सिंगापूर, दक्षिण कोरिया व जपानची कार्यपद्धती आचरणात आणली जावी, अशी मागणी पंतप्रधानाना पत्र लिहून देशभरातील ६०० वैज्ञानिकांनी केली आहे. 

भविष्यात लक्षावधी रुग्णांवर एकाच वेळी उपचार करण्याची पाळी येऊ शकते, याचे भान ठेवून आरोग्य सुविधांचा प्रचंड विस्तार करण्याची गरज या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.  लक्षणे न दिसणा-या, मात्र त्यांचा संसर्ग पसरवणा-या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच योग्य ते उपचार करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

या वैज्ञानिकांनी पंतप्रधानांकडे केलेल्या अन्य शिफारशी याप्रमाणे:

nदेशांतील बहुतेक संशोधन संस्था व विद्यापीठांतील प्राणीशास्त्र विभागांत आरटी- पीसीआर यंत्रे आहेत; त्यांचा वापर कोविड तपासणीसाठी केला जावा. या संस्थेतील अध्यापक व विद्यार्थी आपली सेवा देण्यास तयार आहेत; त्यांचा वापर व्हावा..

nएखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास त्याच्या निवासाचा समग्र परिसर, शेजारीपाजारी, नजिकची बाजारपेठ, तसेच त्या व्यक्तीने भेट दिलेल्या भागांतील जनतेची तपासणी केली जावी. यासाठी चाचण्यांचे प्रमाण प्रचंड वाढवावे, चाचणी कीट्स व प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे व विज्ञान शाखेच्या बेकार पदवीधरांना सेवेत घेऊन प्रशिक्षण देण्यात यावे.

nकोरोना विषाणूच्या जनुकीय सिक्वेन्सिंगमध्ये भारत बराच पिछाडीवर आहे. विषाणूची किती उत्प्रेरिके देशात सक्रिय आहेत, याविषयीची माहितीही उपलब्ध नाही. यामुळे कोविड व्यवस्थापनात अडचणी येत आहेत. त्या दूर करताना भारतीय रुग्णांचे जिनोमिक सिक्वेन्सिंगचे प्रमाण वाढवून ती माहिती जाहीर करव्यात. 

nथेट प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विलगीकरण विभाग कुरू करण्यात यावेत. खासगी रुग्णालयांतील संसाधनांच्या मदतीने खास विभाग तयार करून तेथे रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत. देशातील इनडोअर स्टेडियम व तत्सम सुविधांना कोविड रुग्णालयांत रूपांतरित करावे व तेथे काम करण्यासाठी खासगी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिकांचे साहाय्य घ्यावे. 

nआरोग्यकर्मींसाठी मोठ्या प्रमाणात पीपीई गिअर, तसेच आम लोकांसाठी मास्क व सॅनिटायझरचे उत्पादन वाढवताना लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्यांना त्या कामासाठी वापरावे.nअत्यल्प वेळेत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स उत्पादित करण्याचे आव्हान देशासमोर आहे. तुलनेने स्वस्त असलेल्या व्हेंटिलेटर्सचे डिझाईन देशातील संशोधकानी तयार केले आहेत. काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही आपले डिझाईन उघड केले आहेत. भारतीय उत्पादकांना हे व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यासाठी उत्तेजन दिले जावे.nआकस्मिक लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांनी दाटीवाटीने राहू नये यासाठी राज्य सरकारांच्या मदतीने त्यांच्या प्रस्थानाची व्यवस्था करण्यात यावी 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या