सिंहस्थ बातमी
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
खासगी वाहतूक व्यावसायिकांनाही सिंहस्थाचे वेध
सिंहस्थ बातमी
खासगी वाहतूक व्यावसायिकांनाही सिंहस्थाचे वेधसिंहस्थ कुंभमेळा : इतर जिल्ांमधून करणार भाविकांची वाहतूकनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात येणार्या लाखो भाविकांच्या वाहतुकीसाठी परिवहन महामंडळाने तयारी केली असतानाच, खासगी वाहतूकदारांनीही त्यांची तयारी करीत बाहेरील जिल्ांमधून भाविकांची वाहतूक करण्यासाठी नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे. बा वाहनतळांवरून भाविकांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विविध प्रकारची वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. इतर राज्यांमधून आणि महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ांमधून शाहीस्नानाच्या तारखा व त्या तारखांना लागूनच नाशिक दर्शन असे नियोजन करणार्या कंपन्यांनी भाविकांना राहण्याचे पॅकेजही उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. सिंहस्थ काळात नाशिकमध्ये निवासाचे ठिकाण उपलब्ध होत नाही आणि शहरांतर्गत जिल्ात इतरत्र फिरण्याची इच्छा असताना माहिती नसल्याने तेथे फिरता येत नाही. अशी परिस्थिती असलेल्या परराज्यांतील विशेषत: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहारमधील भाविकांना त्यांच्या राज्यातून घेऊन येणे, कुंभमेळा, शाहीस्नानानंतर नाशिक दर्शन करून पुन्हा त्यांच्या राज्यात नेणे अशा पॅकेजची योजना ट्रॅव्हल कंपन्यांमार्फत आखली जात आहे. यासाठी स्वतंत्र पॅकेज निर्मितीची तयारी काही कंपन्यांची आहे. याशिवाय ज्या कंपन्यांच्या शाखा नाशिकशिवाय इतर राज्यांमध्ये आहेत अशा ठिकाणच्या कार्यालयांमधून नाशिककडे भाविकांना आणण्याची तयारी या कंपन्या करीत आहेत. सिंहस्थ शाहीस्नानाच्या तारखा जाहीर झाल्यामुळे त्या कार्यालयांमध्येही आतापासूनच नाशिक वारीच्या फेर्यांचे बुकिंग फुल्ल होत आहे. नाशिकपर्यंत आणण्यासाठी मोठ्या बसेस, तसेच टुरिस्ट कंपन्यांच्या वतीने रेल्वेचेही आरक्षण करण्यात येणार असून, उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या ठिकाणच्या प्रवाशांसाठी रेल्वेच्या संपूर्ण बोगीच बुक कराव्या लागणार असल्याचे काही टुरिस्ट व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात बसच्या पॅकेजबरोबरच रेल्वेच्या पॅकेजवरही भर दिला जाणार असल्याचे चित्र आहे. परराज्यातून चांगला प्रतिसादखासगी प्रवासी वाहतूकदारांना सिंहस्थासाठी दुसर्या राज्यातील प्रवाशांकडून सिंहस्थातील प्रवासाशिवाय त्याच काळात नाशिक, शिर्डी, शनिशिंगणापूर क्षेत्रदर्शन यासाठी विचारणा केली जात आहे. त्यासाठी मोठ्या टुरिस्ट कंपन्यांनी पॅकेजेस तयार केले आहेत. त्यात प्रवासासह हॉटेलिंग आणि केटरिंगचाही समावेश आहे. यासाठी स्थानिक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नाशिक, त्र्यंबक आणि वणी यांना प्राधान्य दिले आहे. देशभरात आमच्या विविध ठिकाणी शाखा असल्याने तेथील भाविकांनी आत्तापासूनच बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.- ब्रिजमोहन चौधरी (टुरिस्ट व्यावसायिक)महाराष्ट्र दर्शनचीही मागणीबाहेरून येणार्या प्रवाशांना विविध प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांना भेेटी देण्यासाठी तीन दिवसांच्या पॅकेजेसचे नियोजन केले आहे. बाहेरील राज्यातील आमच्या ट्रॅव्हल्स एजंटच्या माध्यमातून थेट विमानतळापासून त्यांना सेवा दिली जाईल. त्यासाठी आमच्या बाहेरगावच्या ग्राहकांना आम्ही मॅसेज आणि मेल केले आहेत. त्यास प्रतिसाद देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांमधून थेट ग्रुप बुकिंग होते आहे. सिंहस्थात नाशिकला येणार्या भाविकांकडून महाराष्ट्र दर्शनाचीही मागणी होते आहे. त्यानुसार आम्ही पॅकेज तयार केले आहे. - रामअवतार चौधरी (श्रीराम ट्रॅव्हल्स)