शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
4
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
5
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
6
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
7
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
8
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
9
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
10
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
11
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
12
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
13
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
14
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
15
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
16
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
17
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
18
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
19
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
20
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान

Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 21:50 IST

अमेरिकेसह अनेक आशियाई देशांमध्ये कोविड-१९ च्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये अचानक सायलेंट हृदयविकाराच्या बाबतीत एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे.

नाचता नाचता किंवा क्रिकेट खेळताना अचानक बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे पोहोचल्यानंतर कळले की त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना आपल्याकडे घडल्याचे पाहायला मिळाले.  पण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमागील कारण आता उघड झाले आहे. आयआयटी इंदूर आणि आयसीएमआर यांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनातून याबाबत मोठा खुलासा झाला आहे. 

कोविड-१९ चा डेल्टा प्रकार हा सायलेंट हार्ट अटॅकचे कारण आहे. याशिवाय, या प्रकारामुळे थायरॉईड देखील अनियंत्रित होत आहे. हे संशोधन जर्नल ऑफ प्रोटिओम रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे. 

३१३४ रुग्णांच्या डेटाचा अभ्यास

आयआयटी इंदूर आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी एकत्रितपणे Covid-19 च्या वेगवेगळ्या व्हेरिएंटच्या परिणामांवर संशोधन केले. यासाठी, संशोधकांनी कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील ३१३४ रुग्णांचा डेटा घेतला. यामध्ये, Covid-19 च्या मूळ व्हेरिएंटनी संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मेटाबॉलिक, बायोकेमिकल, हेमेटोलॉजिकल, लिपिड बदलांचा डेटा, अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा यांचे विश्लेषण करण्यात आले. मशीन लर्निंगचा वापर करून, सी-रिएक्टेस प्रोटीन, डी-डायमर, फेरिटिन, न्यूट्रोफिल्स, पांढऱ्या रक्त पेशींची संख्या, युरिया, क्रिएटिनिन, लिम्फोसाइट्स, लॅक्टेट यांच्या पातळीबद्दल माहिती मिळवण्यात आली. याशिवाय, स्पाइक प्रोटीनच्या संपर्कात येणाऱ्या फुफ्फुस आणि कोलन पेशींचे विश्लेषण करण्यात आले.

या संपूर्ण अभ्यासात, डेल्टा व्हेरिएंटमुळे मानवी शरीरात रासायनिक असंतुलन निर्माण होते. यामुळे कॅटेकोलामाइन्स आणि थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीची प्रक्रिया विस्कळीत झाली. यामुळे लोक सायलेंट हार्ट अटॅक आणि थायरॉईड असंतुलनाचे बळी ठरले, असं संशोधकांना आढळून आले. 

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत दुखणे, घाम येणे, अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असतात. पण सायलेंट हार्ट अटॅकमध्ये ही लक्षणे दिसत नाहीत. अचानक व्यक्ती बेशुद्ध पडतो. जोपर्यंत कोणालाही काही समजत नाही तोपर्यंत त्याचा मृत्यू होतो.

काळजी काय घ्यायची?

दररोज किमान ३० मिनिटे चालावे

रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

तळलेले आणि पॅक केलेले पदार्थ खाणे टाळा

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

या लोकांचा संशोधनात सहभाग होता

हे संशोधन IIT इंदूरचे डॉ. हेमचंद्र झा आणि KIMS भुवनेश्वरचे डॉ. निर्मल कुमार मोहकुड यांनी केले आहे. आयआयआयटी प्रयागराजच्या प्रा. सोनाली अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डेटाचे विश्लेषण करण्यात आले. याशिवाय बुद्धदेव बराल, नम्रता मिश्रा, शुभ्रांशु पात्रा, मानस रंजन, सिद्धार्थ सिंग, तरुण प्रकाश, वैशाली सैनी, देव कुमार रथ, ज्योतिर्मयी वहिनीपती, प्रियदर्शिनी पांडा, कार्तिक मुदुली, हेमेंद्र सिंह परिहार, अजय कुमार मीना, सोम यांचाही या संशोधनात सहभाग होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस